अकोला पोलिसांची कारवाई: बार्शीटाकळीत गोवंश कत्तल व मांस विक्रीप्रकरणी एकास अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला

दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी बार्शीटाकळी शहरातील कसाबपुरा (जामा मस्जिद जवळ) भागात गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी घरात ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बार्शीटाकळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.



आरोपीची माहिती :-

  • नाव: जुबेर अहमद मोहम्मद हनिफ



  • वय: ३९ वर्षे

  • पत्ता: कसाबपुरा, बार्शीटाकळी जि. अकोला



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :- छापा टाकल्या नंतर आरोपी हा घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश जनावराचे मांस विक्रीसाठी लहान-लहान तुकडे करताना रंगेहात आढळला. पंचांसमक्ष पोलिसांनी खालीलप्रमाणे एकूण १६,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला:

  • गोवंश मांस: ६५ किलो (प्रति किलो २४० रुपये दराने किंमत १५,६०० रुपये)



  • लोखंडी सुरा: १ नग (किंमत १०० रुपये)

  • लोखंडी तराजू काटा: १ नग (किंमत ४०० रुपये)

  • वजन मापे: २ नग (किंमत २०० रुपये)

गुन्हा व कायदेशीर कारवाई :- आरोपीविरुद्ध ‘प्राणी संरक्षण अधिनियम’ आणि ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

पोलीस पथक :-

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मूर्तिजापूर)  वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आनंद कांदे, देवर्जनकर तसेच गोकुळ चव्हाण, ईश्वर पातोंड, सचिन सोनटक्के, अनिकेत चव्हाण, गणेश पाटील, पवन भाकरे, महिला पोलीस अंमलदार दिपाली गोडसे आणि चालक आशिष तायदे, श्रीहरी कराळे यांच्या पथकाने पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!