मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकींवर गोंदिया पोलिसांची कडक कारवाई; ५ वाहने जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया: गोंदिया शहरात दुचाकींमध्ये कंपनीचे मूळ सायलेन्सर काढून मॉडिफाइड (सुधारित) सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहने चालवणाऱ्यांवर जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा वाहनांमधून निघणाऱ्या फटाक्यांसारख्या कर्णकर्कश आणि मोठ्या आवाजामुळे नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या वाढत्या त्रासाची दखल घेत गोंदिया जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम राबवून ५ दुचाकी जप्त (डिटेन) केल्या आहेत.

वाहतूक शाखेची विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. गारेख भामरे साहेब यांच्या थेट आदेशान्वये, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया यांच्यातर्फे ४ सप्टेंबर २०२६ रोजी शहर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाई दरम्यान ५ दुचाकींवर मॉडिफाइड सायलेन्सर आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून सर्व वाहने वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आली आहेत.



कारवाई करणारे पोलीस पथक ही धडक कारवाई गोंदिया पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता:

  • प्रभारी अधिकारी: नागेश भास्कर (पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा)



  • श्रेणी पोलीस निरीक्षक: श्रावण गेडाम, छत्रपालसिंग चंदेल

  • पोलीस अंमलदार (हवालदार व शिपाही):



    • जफरअली सय्यद  गणेश काकडे , अमित मुझारीया आनंद बावण थडे, गणेश लिल्हारे प्रेमलाल ताराम 

    • मनिष मारवाडे  जयराम मांजरटे  अरविंद तावाडे  विवेक कटरे प्रविण वाढिवे  उमेश गजभिये 



    • विनोद हरिणखेडे विक्की दगडे 

यापुढेही कारवाई तीव्र राहणार; पोलिसांचा इशारा यापुढेही शहरात किंवा जिल्ह्यात कुठेही मॉडिफाइड सायलेन्सर लावून फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या दुचाकी आढळल्यास, त्यांच्यावर अधिक प्रभावीपणे कायदेशीर कारवाई केली जाईल व वाहने जप्त केली जातील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना आवाहन: मॉडिफाइड सायलेन्सरच्या आवाजामुळे लहान मुले, वृद्ध तसेच आजारी व्यक्तींना तीव्र त्रास होतो. त्यामुळे दुचाकी चालकांनी आपल्या वाहनांमध्ये असे सायलेन्सर वापरू नयेत आणि नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गोंदिया पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!