चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे बक्षीसपत्राच्या वादातून तिहेरी हत्याकांड; एक आरोपी अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

१. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शेतीचा वाद

  • कुटुंबाची माहिती: सुरडकर कुटुंबात संजय फत्तेसिंग सुरडकर , दीपक फत्तेसिंग सुरडकर  आणि अजय फत्तेसिंग सुरडकर  असे तीन भाऊ आहेत. त्यांचे वडील फत्तेसिंग सुरडकर हे सैन्यात होते आणि त्यांच्या निधनानंतर आई सरस्वती यांना पेन्शन मिळत होती.

  • जमिनीची मालकी: कुटुंबाकडे एकत्रितपणे सुमारे ७ ते ८ एकर शेती होती. त्यातील प्रत्येकी सुमारे दोन एकर जमीन तिन्ही भावांना वाटप करण्यात आली होती, तर उरलेली जमीन आई सरस्वती यांच्या नावावर ठेवण्यात आली होती.



  • वादाचे कारण: मोठा भाऊ संजय हा स्वतःच्या वाट्याची जमीन कसण्यासोबतच आईच्या नावावरील दोन एकर जमीनही कसत होता आणि आईची देखभाल करत होता. आईकडील शेतीचा ताबा आणि पेन्शनचा लाभ संजयला अधिक मिळत असल्याचा संशय व त्यावरून निर्माण झालेली नाराजी मधल्या भावाच्या (दीपक सुरडकर) मनात धुमसत होती, ज्यातून हा वाद विकोपाला गेला.

२. हत्येची रात्रीची घटना (८ ऑक्टोबर २०२६) :-

  • वेळ व स्थळ: दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:०० दरम्यान आरोपींच्या घरासमोर ही घटना घडली.



  • हल्लेखोर: दीपक फत्तेसिंग सुरडकर आणि त्याचा मुलगा जगदीश दीपक सुरडकर यांनी हा जीवघेणा हल्ला केला.

  • हल्ल्याचे स्वरूप: बक्षीसपत्राद्वारे शेती नावावर करून देण्याच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादातून आरोपींनी धारदार चाकू आणि इळद्याच्या काठीने केलेल्या बेछूट वारामध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.



३. मृत व्यक्तींची नावे:-

या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा अंत झाला:

  • सरस्वती फत्तेसिंग सुरडकर 



  • संजय फत्तेसिंग सुरडकर

  • रंजित संजय सुरडकर 

४. कायदेशीर कारवाई आणि तपास:-

  • गुन्हा दाखल: मृताच्या पत्नी  मुक्ता संजय सुरडकर यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशनमध्ये अप. नं. 895/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS)  अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • फरारी आरोपीचा शोध: मुख्य आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर हा घटनेनंतर फरार असून, त्याला पकडण्यासाठी चिखली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) विशेष पथके कसून शोध घेत आहेत.

अटकेची कारवाई:

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४:४९ वाजता आरोपी जगदीश दीपक सुरडकर (वय २१ वर्ष) याला बेड्या ठोकल्या.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!