अमरावती गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; २५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती (दि. २४ नोव्हेंबर २०२६):  अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू चोरी व वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत ट्रॅक्टर, एक्सकॅव्हेटर मशिन आणि वाळूसह एकूण २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा तपशील

अमरावती शहरातील अवैध वाळू/रेती चोरी आणि वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली.



दिनांक २३/११/२०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गोपाळ नगर परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर शाळेसमोर छापा टाकला. तेथे साठवून ठेवलेली वाळू एका लाल रंगाच्या महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टरच्या (क्र. MH-27 L-8481) ट्रॉलीमध्ये (क्र. MH-27 EJ-1279) एक्सकॅव्हेटर मशिनच्या साहाय्याने भरताना आरोपी आढळून आले. त्यानंतर महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने आरोपींवर कारवाई करून वाहने व मुद्देमाल जप्त करण्यात आला.



याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात अप.क्र  बीएनएस (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



ताब्यात घेतलेले आरोपी

  1. सैय्यद ईमरान सैय्यद अकील (वय ३० वर्षे), रा. अप्पा हॉटेलजवळ, रिंग रोड, नवसारी, अमरावती

  2. समशाद अली सल्लाउद्दीन अन्सारी (वय २२ वर्षे), रा. ह.मु. नूर नगर, धरम काटा, अमरावती



जप्त केलेला मुद्देमाल

अ.क्र. मुद्देमालाचा तपशील अंदाजे किंमत
१ लाल रंगाचा महिंद्रा ५७५ डीआय ट्रॅक्टर (क्र. MH-27 L-8481) व ट्रॉली (क्र. MH-27 EJ-1279)

₹५,००,०००/-

२ कोबेल्को कंपनीची निळसर हिरव्या रंगाची एक्सकॅव्हेटर मशिन

₹२०,००,०००/-



३ ४ ब्रास वाळू (मंडळ अधिकारी यांच्या मते)

₹४०,०००/-

एकूण

₹२५,४०,०००/-

कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई?

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-०१)  यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-०२)  शाम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती प्राजंली सोनवणे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!