
यशोधरानगर पोलिसांची धडक कारवाई: ४ गाड्यांसह २ सराईत चोरट्यांना अटक
यशोधरानगर पोलिसांची कामगिरी: वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक, ०४ गुन्हे उघडकीस
नागपूर शहरातील यशोधरानगर पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
घटनेची पार्श्वभूमी आणि फिर्याद
-
दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ते दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:५० वाजता दरम्यान, फिर्यादी फैजान समशेर खान (वय २३ वर्षे, रा. नुरी मशिदीजवळ, बेले नगर, कळमना, नागपूर) यांनी त्यांची बर्गमन मोपेड (क्र. एम.एच. ४९ सी.आर. ९२२७, किंमत ८०,०००/- रुपये) ही यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑटोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनजवळ पान ठेलेच्या बाजूला लॉक करून पार्क केली होती.

-
अज्ञात चोराने ही मोपेड चोरून नेली, ज्यावरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि आरोपींची धरपकड
-
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान हुसेन रशीद हुसेन (वय २२ वर्षे, रा. उस्मानिया मशिद मागे, हसनबाग, ह.मु. मोठा ताजबाग, सिंधीबन, सक्करदरा, नागपूर) यास ताब्यात घेतले.

-
कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार शेख सुलतान शेख यासीन (वय २३ वर्षे, रा. फिरोज पान ठेल्यासमोर, सिंधीबन, मोठा ताजबाग, सक्करदरा, नागपूर) याच्यासह संगनमताने वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले गुन्हे आणि जप्त मुद्देमाल
आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे एकूण ०४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले:

-
पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतून – सुझुकी एक्सेस १२५ (क्र. एम.एच. ४९ सी.पी. ३३७१) आणि होंडा अक्टीवा (क्र. एम.एच. ४९ सी.टी. ७१४६).
-
पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतून – अक्टीवा (क्र. एम.एच. ४९ सि.व्ही. ९४९५).

-
एकूण २,७५,०००/- रुपये किमतीची ४ चोरीची वाहने जप्त करण्यात आली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे.
मार्गदर्शन आणि कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे
ही यशस्वी कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (परि.क्र. ५) नित्यानंद झा, आणि सह. पोलीस आयुक्त (कळमना विभाग) रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली.
या पथकात वपोनि. युनुसचांद शेख, दुपोनि. विवेकंद भारती, पोउपनि. निळकंठ नन्नावर, पोहवा. राजेश वासनिक, रवि आहीर, पोअं. अमोल भेंडेकर, लक्ष्मण पडवाल, रितेश दुघे आणि गजानन गेडाम यांनी सहभाग घेतला होता.




