सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: वर्ध्यात मध्य प्रदेशातील विदेशी दारू जप्त, आरोपी जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: वर्ध्यात मध्य प्रदेशातील विदेशी दारूची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा (दि. १२): सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या पथकाने एका कारवाईत मध्य प्रदेशातून अवैधरित्या आणलेली विदेशी दारू जप्त केली आहे. दत्तपूर चौकात सापळा रचून केलेल्या या नाकेबंदी दरम्यान मारुती सुझुकी ब्रेझा कारमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई: दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवाग्राम पोलिसांना मिळालेल्या खबऱ्यावरून (गोपनीय माहितीवरून) पोलिसांनी दत्तपूर चौकात, पवनार ते वर्धा जाणाऱ्या मार्गावर नाकेबंदी केली होती. या दरम्यान संशयित मारुती सुझुकी ब्रेझा कार (क्रमांक MH-32-AH-3417) आली असता पोलिसांनी ती थांबवली. चालकाच्या जागेवर बसलेल्या आरोपीची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.



जप्त केलेल्या मुद्याचा तपशील:

  • ‘ऑफिसर चॉइस’ विदेशी दारू (१८० मिली): २३ खड्ड्यांच्या खोक्यात एकूण १,१०४ शिश्या, किंमत २,७६,००० रुपये.



  • ‘ऑफिसर चॉइस ब्लू’ काचेच्या बाटल्या (१८० मिली): दोन खड्ड्यांच्या खोक्यात एकूण ९६ शिश्या, किंमत २८,८०० रुपये.

  • वाहन: गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी ब्रेझा कार, किंमत ७,००,००० रुपये.



  • एकूण जप्त माल: १०,०४,८०० रुपये.

आरोपीची माहिती: सदर कारवाईत पकडलेल्या आरोपीचे नाव दिनेश अशोकराव येंडाळे (वय ३५ वर्षे, रा. नालवाडी, वर्धा) असे आहे. तो मध्य प्रदेशातून उपलब्ध झालेली विदेशी दारू कारमध्ये भरून नागपूर-पवनार मार्गे वर्ध्याकडे नेत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.



मार्गदर्शन:

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी  सुनील मंडलिक यांच्या आदेशानुसार, सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टॉप ग्रेड पो.उप.नि. अजयकुमार येळणे, पो.हवा. संदीप मेंढे, स.फौ. सतीश दरवरे आणि पो.शि. अक्षय गुडापे यांनी पार पाडली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!