जेसीबी चोरीप्रकरणी आंतरराज्य ५ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपूर (विशेष बातमीदार): नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर वेगाने कारवाई करत नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ०४ च्या पथकाने एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली १८ लाख रुपयांची जेसीबी मशीन शोधून काढत गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील बालाघाट येथून ५ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

नागपूर येथील एकता नगर, गोरेवाडा रोड निवासी फिर्यादी वैभव केशवराव घोरमाडे (वय ४५) यांची ‘इंडिया लिमिटेड’ कंपनीची ३ डीएक्स जेसीबी मशीन (क्र. MH 31 GA 6732) ही ९ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री ९.३० ते १० ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी ९.०० वाजताच्या दरम्यान बेलतरोडी हद्दीतील संस्कृती सोसायटी, जगन्नाथनगर येथून अज्ञात चोरांनी लांबवली होती.



याबाबत फिर्यादींच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.



अशी झाली कारवाई (गुन्हे शाखेचा तांत्रिक तपास)

बेलतरोडी पोलिसांसोबतच गुन्हे शाखा युनिट क्र. ०४ चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे चोरांचे नेटवर्क मध्य प्रदेशात सक्रिय असल्याचे समोर आले.



गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कटंगी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) येथे धाव घेऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि ५ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी संगनमताने जेसीबी चोरी केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. रेहान खान सुलतान खान (वय ३०) – रा. कटंगी, जि. बालाघाट (म.प्र.)



२. आशिष हंसराज सहारे (वय २५) – रा. रामपुरी, पो. सिहोरा, जि. बालाघाट (म.प्र.)

३. सचिन चंद्रशेखर गौतम (वय २१) – रा. चांदटोला, जि. बालाघाट (म.प्र.)



४. अफरोज खान वाहिद खान (वय ४०) – रा. लालबरं, जि. बालाघाट (म.प्र.)

५. देवेन्द्रकुमार उपाराम सहारे (वय ४०) – रा. बोरी मोहगाव, जि. बालाघाट (म.प्र.)

जप्त मुद्देमाल:

  • ३ डीएक्स जेसीबी मशीन (किंमत रु. १८,००,०००/-)

  • ०५ मोबाईल हँडसेट (किंमत रु. ५०,०००/-)

    👉 एकूण जप्त ऐवज: रु. १८,५०,०००/-

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मुद्देमालासह पुढील न्यायालयीन व कायदेशीर कारवाईसाठी बेलतरोडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तपास पथक व मार्गदर्शन:

सदर धडक कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त  नविचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेन्द्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दिपक अग्रवाल, व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)  वैभव जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी पथक:

मपोनि संजीवनी थोरात, सपनि वैभव बारंगे, पोउपनि जितेशाचारी आरवेल्ली, पोहवा भगवतीकुमार ठाकुर, पुरूषोत्तम जगनाडे, अभिषेक शनिવારે, पोअं. गोविंद देशमेश आणि महेश काटवले.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!