राजुरा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; २० जण ताब्यात, २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


राजुरा पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; बामणवाड्यातील ‘नक्षत्र हॉल’मधून २० जण ताब्यात, २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर: पोलिस स्टेशन राजुरा अंतर्गत येणाऱ्या बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर राजुरा पोलिसांनी मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तब्बल २० ईसडूंना (आरोपींना) ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



कार कारवाई कशी घडली?

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती तसेच ‘डायल ११२’ वरून मिळालेल्या माहितीनुसार, बामणवाडा येथील नक्षत्र हॉलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रात्रौ ड्युटीवरील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ नक्षत्र हॉल येथे छापा टाकला. तेथे टेबलावर बसून २० ईसम ५२ तासपत्त्यांवर हार-जितचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.



ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे:

घटनास्थळी जुगार खेळताना आढळलेल्या २० जणांची नावे खालीलप्रमाणे आहेत:



  1. गोपाल नारायण झवर

  2. दिनेश कृष्णजी आकनूरवार



  3. अशोक छबलदार चैन्नानी

  4. बंडू मारोती जयपुरकर



  5. दीपक मुलिधर मंगरुळकर

  6. सुशील मदनलाल चाडक

  7. सावंत अकलु बोडोवार

  8. मारोती नामदेव चिंचोळकर

  9. शरद मुरलीधर मंगरुळकर

  10. अक्षय गजानन काशेट्टीवार

  11. किशोर दत्तात्रय हिंगाने

  12. राजु वंसतराव साईनवार

  13. राजेश मोहनलाल बजाज

  14. उमेश केशवराव कोडावार

  15. अशोक अंबाराम ठक्कर

  16. निलकंठ दत्तुजी पचारे

  17. विशाल अमूललाल जैस्वाल

  18. दिलीप श्यामसुंदर वांडरे

  19. जुबेर अन्सार हनफि

  20. नरेंद्र भिवाजी काकडे (सर्वजण रा. राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

आरोपींची अंगझडती व जुगार टेबलवरील झडतीदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

  • रोख रक्कम: ५८,३००/- रुपये (आरोपींच्या अंगझडती व जुगार टेबलवरील)

  • मोबाईल फोन: १२ नग (किंमत अंदाजे २,३५,०००/- रुपये)

  • तास पत्ते: ५२ पत्त्यांचे ६ सेट (किंमत ३००/- रुपये)

  • एकूण जप्त मुद्देमाल: २,९३,६००/- रुपये

गुन्हा दाखल:

सदर प्रकरणावरून पोलीस स्टेशन राजुरा येथे अप क्रमांक ८०७/२०२६ नुसार कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मार्गदर्शक व कारवाई करणारे पथक:

सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनी योगेश पाटील, पोकॉ/सफौ राजनारायण ठाकुर, पोलीस अंमलदार आकाश पिपरे आणि राजिब दुबे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!