
गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

नागपूर:
पोलिसांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून नागपूर शहरात विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या एका हद्दपार इसमाला गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दिनांक ०१.११.२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

घटना कशी घडली?

दिनांक ०१.११.२०२६ रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्र. ६ चे अधिकारी व अंमलदार हद्दपार आरोपींची तपासणी (चेक) करत होते. यादरम्यान, पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील सेक्टर क्र. १२, चिल्ला शरीफ दर्गाजवळ, श्रीकृष्णधाम झोपडपट्टी, नागपूर येथे राहणारा हद्दपार इसम आतिष उर्फ ऑस्टीन रॉबर्ट फ्रान्सिस (वय २८ वर्षे) याच्या घरी जाऊन तपासणी केली असता, तो घरीच मिळून आला.

त्याचा गुन्हे अभिलेख (Criminal Record) तपासला असता, पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ०६ यांच्या हद्दपार आदेश क्रमांक ११/२०२६, दिनांक २१.०८.२०२६ अन्वये त्याला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल आणि अटक:

आरोपी हा हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता पोलीस ठाणे हद्दीत राहत्या घरी समक्ष मिळून आला. त्याने न्यायालयाच्या/प्रशासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे कोराडी येथे कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मार्गदर्शन व कारवाई करणारे पथक:

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर), दीपक अग्रवाल (पोलिसा उप आयुक्त, डिटेक्शन) आणि वैभव जाधव (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (पोनि) भरत कऱ्हाडे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी पार पाडली आहे.



