अकोल्यात डाबकी रोड परिसरातील घरफोडीचा पर्दाफाश; ७६ हजारांच्या मुद्देमालासह आरोपी अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला:

स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अकोला पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यांची अवघ्या काही वेळात उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेला ७६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



घटनेचा संक्षिप्त पार्श्वभूमी: डाबकी रोड, अकोला येथील रहिवासी फिर्यादी अब्दुल राजीक अब्दुल रहमान (वय २२ वर्षे, रा. गौसीया कॉलनी, गंळकी आर.पी.टी.एस. रोड, अकोला) यांच्या बंद घरात अज्ञात इसमाने शिरकाव केला. चोराने घरातील घरगुती वापराची विविध भांडी, साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण ७६,१०० रुपयांचा माल लांबवला होता. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरेकर यांनी पोउपनि विष्णू बोडखे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले. तपास दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपी अल जासीम मोहम्मद शफी (वय २७ वर्षे, रा. भगतवाडी गल्ली नं. १३, डाबकी रोड, अकोला) याला पंचायत समिती, अकोला परिसरातून ताब्यात घेण्यात आले.



मुद्देमाल जप्त: पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पंचांसमक्ष त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, चोरलेला इगो  कंपनीचा टीव्ही व इतर घरगुती साहित्य (किंमत ₹७६,१००) हस्तगत करण्यात आले. आरोपीस पुढील कारवाईसाठी डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

तपास पथक:



ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विष्णू बोडखे, पोलीस अंमलदार सुलतान खाँ बिस्मिल्ला खाँ पठाण, अमित बबन दुबे, पवन गजानन डांबलकर व सतीश मुरलीधर पवार यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!