२४ तासांच्या आत बोकड चोरीचा गुन्हा उघड; पारशिवनी पोलिसांची कारवाई, ३ आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पारशिवनी (नागपूर ग्रामीण): नागपूर ग्रामीण क्षेत्रातील पारशिवनी पोलिसांनी धडक कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला १२,००० रुपये किमतीचा बोकड जप्त केला आहे.

  • घटनेची पार्श्वभूमी व तक्रार: दिनांक ०२/०९/२०२६ रोजी पारशिवनी तालुक्यातील पालासावळी येथील रहिवासी फिर्यादी सुधाकर जानराव कापडे यांनी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मौजा बच्छेरा शेत शिवारातील गोठ्याची लोखंडी जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी त्यांची १२,००० रुपये किमतीची बोकड चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदवला.



  • आरोपींना अटक: घटनेचे गांभीर्य ओळखून, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक  अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (रामटेक विभाग) श्री रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलिसांच्या तपास पथकाने विशेष मोहीम राबवली.

    नागपूर ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान खालील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:



  • १. विलास हरी राऊत (वय ३२ वर्षे, रा. बिटोली)

  • २. स्वप्नील रमेश राऊत (वय २३ वर्षे, रा. बिटोली)



  • ३. दीपक सुरेश कोहळे (वय ३२ वर्षे, रा. पालासावळी, ता. पारशिवणी)

  • मुद्देमाल जप्त व उत्कृष्ट कामगिरी: ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी बोकड चोरीच्या या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल (१२,००० रुपये किमतीचा बोकड) जप्त केला आहे.



    ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी (रामटेक)  रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेरकी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) गंगाप्रसाद वरखडे, पोलीस हवालदार (पोहवा) संदीप नागोसे, वीरेंद्र नरड, अशोक निस्ताने आणि जगदीश उईके यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!