
तेलंगणातील रिम्स रुग्णालयातील २० लाखांच्या व्हेंटिलेटर चोरीचा पर्दाफाश; चंद्रपूर पोलिसांकडून आरोपी जेरबंद

पोलिसांची धडाकेबाज कारवाई: तेलंगणातील २० लाखांच्या व्हेंटिलेटर चोरीचा चंद्रपूर पोलिसांकडून पर्दाफाश!
महत्त्वाचे मुद्दे एका नजरेत:
-
घटना: तेलंगणातील आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयातून ४ व्हेंटिलेटरची चोरी.
-
अंदाजित किंमत: तब्बल २० लाख रुपये (प्रत्येकी ५ लाख रुपये).

-
कारवाई करणारी यंत्रणा: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB).

-
जेरबंद आरोपी: सज्जन वसंत मोटे (वय ४५, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर).

नेमकी घटना काय होती?
तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील ‘राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था’ (RIMS) या शासकीय रुग्णालयात एक खळबळजनक चोरीची घटना घडली होती. गत ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रिम्सच्या RICU, SARI आणि TB वॉर्डमधून प्रत्येकी ५ लाख रुपये किमतीचे एकूण ४ व्हेंटिलेटर अज्ञात चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी आदिलाबाद-II टाऊन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपास आणि पोलिसांची गोपनिय चक्रे:
गुन्ह्याचे गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. आदिलाबाद येथील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचे कसून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यादरम्यान, मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित आरोपी थेट चंद्रपूर शहरात लपून बसल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागली.

आरोपी अखेर जाळ्यात:
माहिती मिळ Fiताच चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवत अंचलेश्वर गेट परिसरात सापळा रचला. या कारवाईत सज्जन वसंत मोटे (वय ४५ वर्षे, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या खाकी खाष्ट्यासमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला पुढील तपास व जप्तीसाठी तेलंगणा पोलिसांच्या विशेष पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यशस्वी पोलीस पथक:
ही धडाकेबाज कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार तसेच पोलीस अंमलदार सतीश अवथरे, इमरान खान, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, लालु यादव, शशांक बादामवार आणि किशोर वाकाटे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.




