कळमना पोलिसांची कामगिरी: ई-रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपूर क्राईम: कारखान्याबाहेर उभी केलेली ई-रिक्षा लांबवणारा चोरटा जेरबंद; कळमना पोलिसांची धडक कारवाई!

नागपूर:

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास माल घेण्यासाठी गेलेल्या एका वाहनचालकाची ई-रिक्षा चोरणाऱ्या अट्टल चोराला कळमना पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरी गेलेली ई-रिक्षा संपूर्ण मुदद्यमालासह जप्त करण्यात आली आहे.



घटना नेमकी काय घडली?

  • तारीख व वेळ: १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.०० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास.



  • फिर्यादी: मोहम्मद नईम मोहम्मद सलीम (वय ४२, रा. जमील ले-आऊट, रजा टाऊन, कपिलनगर, नागपूर).



  • घटनाक्रम: फिर्यादी आपली ‘मिनी मेट्रो’ कंपनीची ई-रिक्षा (क्रमांक: MH 49 CF 6502, किंमत अंदाजे ५०,००० रुपये) घेऊन कळमना परिसरातील मुख्तार मशिदीजवळ, वांजरा येथील एका कपड्याच्या कारखान्यात माल घेण्यासाठी आले होते. त्यांनी ई-रिक्षा कारखान्याबाहेर उभी केली आणि ते आत गेले. यादरम्यान संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांची उभी असलेली ई-रिक्षा लांबवली.

  • गुन्हा नोंद: फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.



पोलिसांची कारवाई आणि चोराचा पर्दाफाश

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत कळमना पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.

  • तांत्रिक तपास: पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा व मिळालेल्या खात्रीशीर खबऱ्यांच्या आधारे कसून तपास केला.



  • सापळा व अटक: तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कामना नगर परिसरात सापळा रचून एका संशयित इसमास ई-रिक्षासह ताब्यात घेतले.

  • आरोपीची कबुली: पोलिसांनी गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता, सुरुवातीला टोलवाटोलव करणाऱ्या आरोपीने अखेर वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

  • आरोपीची ओळख: रामेश्वर विठ्ठल निमजे (वय ३६, रा. निमदेवी नगर, कळमना, नागपूर) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.

  • जप्ती: पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली ५० हजार रुपये किमतीची ई-रिक्षा जप्त केली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

यशस्वी कामगिरी करणारे पथक

ही धडक कारवाई उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली:

  • मार्गदर्शन:

  •  पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी 

    • श्री. नित्यंद झा (पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ५)

    • श्री. रोहित ओव्हाळ (सहाय्यक पोलीस आयुक्त, कळमना विभाग)

  • तपास पथकातील अधिकारी व अंमलदार:

    वपोनि. प्रविण काळे, दुपोनि. करीम पठाण, पोउपनि. गजानन राऊत, पोहोवा. प्रमोद कंंगाले, विशाल भैसारे, पोअं. नितीन मिश्रा, ललहीत शेंडे, अविनाश ग्वालवंशी व रोशन निंबेते यांनी या संपूर्ण कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!