
मोक्कासह ५३ गुन्ह्यांत पोलिसांना पाहीजे असलेला आरोपी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत…
पुणे ग्नामीण–(महेश बुलाख) सवीस्तर व्रुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार जानेवारी २०२३ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्हयातील घरफोडी, जबरी चोरी चे तब्बल ५३ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेणेबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. पाहिजे आरोपी अरमान प्रल्हाद नानावत याचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण चे पोलिस शोध घेत होते. तो वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने अरमान नानावत याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती हस्तगत करून आरोपीचे दिनक्रम माहिती करून घेतला. आरोपी अरमान नानावत हा स्पोर्ट बाईकचा वापर करतो मोटार सायकलचा वापर करून गुन्हे करतो आणि मोटार सायकलवरच गुजरात, मध्यप्रदेश असा प्रवास करत असल्याने सकाळी पुणे जिल्हयात असे तर रात्री गुजरात मध्ये तर कधी मध्यप्रदेश मध्ये मुक्काम करायचा. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सलग १३ दिवस पथकाने त्याचेवर लक्ष केंद्रीत करून आरोपी अरमान नानावत हा कोरेगाव भिमा परीसरात आला असल्याची बातमी प्राप्त करून त्यास सापळा रचून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अरमान प्रल्हाद नानावत वय २४ वर्षे रा. वढु खुाता हवेली जि पुणे असे असल्याचे सांगितले. आरोपी अरमान नानावत यास विश्वासात घेवून त्याचे कडे तपासा केला असता, त्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये शिरुर शहरात दोन महिलांचे गळयातील दागिने जबरीने ओढून मोटार सायकल वरून पळून गेला असल्याचे सांगितले. त्याबाबत खात्री करता
१) शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८२ / २०२२
भा.दं.वि.का.क. ३९२


२) शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७३१ / २०२२ भा.दं.वि.का.क. ३९२ प्रमाणे गुन्हे
दाखल असून सदरचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी कडून सुमोर तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किं.रू. १,००,०००/- चे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल,पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
अविनाश शिळीमकर, पोउपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, सफौ हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण पोहवा विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, पोना समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, पोशिपाई निलेश सुपेकर, चासफौ प्रमोद नवले, चापोकॉ दगडू विरकर, यांनी केली असून पुढील तपास
शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप व पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत असून आरोपीस दि १८/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे पुढील तपास सुरु आहे



