
गोंदियात १० लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह २ जण अटकेत; एलसीबीची मोठी कारवाई
गोंदियात स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई: १० लाखांच्या एमडी (Mephedrone) ड्रग्ससह २ आरोपींना अटक
गोंदिया जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २३.२५ ग्रॅम एमडी ड्रग्स, कार आणि मोबाईल असा एकूण १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईचा सविस्तर तपशील:
पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू असताना १४ ऑगस्ट २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, कुंभारेनगर येथील आकाश मेश्राम हा आपल्या साथीदारासह कामठी (नागपूर) वरून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने अंमली पदार्थ घेऊन चुटीया रोडने गोंदियाकडे येत आहे.

माहिती मिळताच एलसीबी पथकाने सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास चिचटोला ते चुटीया मार्गावर नाकाबंदी केली. काही वेळातच चिचटोला कडून येणारी संशयित स्विफ्ट डिझायर कार थांबवून गाडीतील दोघांची पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल:

झडतीदरम्यान आरोपींकडे २ पारदर्शी प्लास्टिक झिप्पर पाऊच आढळले. त्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
-
एमडी ड्रग्स (Mephedrone): २३.२५ ग्रॅम (किंमत ₹४,६५,०००/-)

वाहन: १ पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (किंमत ₹५,००,०००/-)
-
मोबाईल: २ अँड्रॉइड मोबाईल (किंमत ₹३५,०००/-)
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१०,००,०००/- (दहा लाख रुपये)
अटक करण्यात आलेले आरोपी:
-
आकाश दिलीप मेश्राम (वय ४९ वर्षे, रा. सावित्रीबाई फुले वार्ड, गोंदिया)
-
रिजवान इकबाल शेख (वय ३७ वर्षे, रा. रामनगर, बाजार चौक, गोंदिया)
दोन्ही आरोपींवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षकअभय डोंगरे व एलसीबी पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक जंगमवार, सहायक फौजदार राजू मिश्रा, पोलीस हवालदार महेश मेहर, तुळशीदास लुटे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, पोलीस शिपाई राकेश इंदूरकर, सुनील डहाके तसेच चालक पोलीस शिपाई राम खंडारे व निलेश ठाकरे यांनी पार पाडली.




