सातारा येथील रिसॅार्टवर छम छम,पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने मध्यरात्री छापा टाकुन ६ महीलांसह २१ पुरुषांना केली अटक…
सातारा– सवीस्तर व्रुत्त असे की, दि. 28 रोजी रात्री उशिरा पेट्री ता. सातारा येथील राज कास हिल रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी 6 महिला आणून त्या बारबाला या संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात डान्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
त्यानुसार पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले होते. त्यानुसार घोडके यांनी सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सातारा तालुका आणि शहर पोलिस ठाणे स्टाफ सह संबंधित ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमधील हॉलमध्ये सहा बारबाला बीभत्स हावभाव करीत नृत्य करीत असल्याचे दिसून आले. याचबरोबर उपस्थित गिऱ्हाईक हे यांचा आनंद घेऊन त्या बारबालांवर नोटा उडवीत होते. त्या अनुषंगाने हॉलमध्ये बारबाला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या 18 इसमांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले व या 18 जणांच्या ताब्यामधील 82 हजार 698 रुपये त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. तसेच हॉलमधील जी बी एस कंपनीची साऊंड सिस्टिम व डिस्को लाइट देखील जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी रिसॉर्टचे मालक, मॅनेजर आणि वेटर यांसह 21 जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक समीर शेख, यांचे आदेशाने अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी सातारा शहर किरण कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलिस उपनिरीक्षक डी.ए. दळवी, महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याकडील पोलिस हवालदार मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, पोलिस नाईक किरण जगताप, पोलिस कॉन्स्टेबल शंकर पाचांगणे, सातारा शहर पोलिस ठाण्याकडील पोलिस हवलदार
निलेश यादव, पोलिस हवालदार महांगडे, पोलिस कॉन्स्टेबल बामणे यांनी केली