रस्त्यावर वाटसरुंना थांबवुन लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद करून जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून ९७,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात  आला आहे,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलिस स्टेशनची ची कारवाई….

पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,शिरुर शहरात रात्रीचे वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रोडने, जाणारे लोकांची जबरदस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढु लागल्या होत्या. त्याअनुषंगाने अंकीत गोयल पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे  मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. आजूबाजूचे परीसरातील गोपनीय बातमीदार सतर्क केले व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली असता, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे आधारे सदरचे गुन्हे हे शिरूर शहरात राहणारे इसम





१) शिरीष सोपान जाधव, वय १९ वर्षे, रा. होलार आळी, शिरूर, ता. शिरूर जि पुणे
२) संतोष मारूती ढोबळे, वय १९ वर्षे, रा. वाडा कॉलनी, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे



यांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून दोघांना शिरूर शहरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी शिरूर शहरात चार गुन्हे केल्याचे सांगितले असून दोन्ही आरोपींचे ताब्यातून एकूण चार मोबाईल ५२,०००/- रु. किं. चे तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल रु. ४५,०००/- किंच्या जप्त करणेत आलेल्या आहेत. दोन्ही आरोपींकडून
खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.उघडकीस आलेले गुन्हे
१) शिरूर पो स्टे गु.र.नं. १३१८ / २०२३ भादंवि ३९२, ३४
२)शिरूर पो स्टे गु.र.नं. १३१९ / २०२३ भादंवि ३९२, ३४
३)शिरूर पो स्टे गु.र.नं. १३२२ / २०२३ भादंवि ३९२,३४
४)शिरूर पो स्टे गु.र.नं. १३३६ / २०२३ भादंवि ३९२,३४



सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक  अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक,मितेश घट्टे पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, स्था.गु.शा. कडील पोउपनि गणेश जगदाळे, पोलिस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, शिरूर पो स्टे चे पोउपनि एकनाथ पाटील, पोलिस अंमलदार नाथासाहेब जगताप, रघुनाथ हाळनोर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!