
गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांवर अनोळखी ईसमांनी केला गोळीबार…
अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन च्या हद्दीतील कंचनपूर ते मांजरी दरम्यान अज्ञात इसमानी काल मध्यरात्रीच्या दरम्यान गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना
घडली….
उरळ(अकोला)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन चा परीसर तसे पाहता संवेदनशील म्हणूनच गणल्या जातो याचं परिसरातून गोवंश तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्या कारणामुळे पोट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. ठाणेदार
गोपाळ ढोले यांनी उरळ पोलिस स्टेशन चा पदभार स्विकारताच गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसवला होता उरळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार उरळ पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. यामध्ये हातरूण आणि मांजरी भागातही पेट्रालिंग वाढवली आहे. दरम्यान काल रात्री हातरूणचे
बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मूंडे हे चारचाकी पोलिस वाहनात पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर मोटर सायकलवर स्वार असलेल्या लोकांनी गोळीबार केलाय.
या घटनेत दोन्ही पोलिस कर्मचारी थोडक्यात बचावले आहे, असे
ढोले यांनी कळवले आहे. ते म्हणाले की काल मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजताच्या सुमारास पोलिस कर्मचारी दिनकर इंगळे आणि वाहनचालक मुंडे हे मांजरी कंचनपूर रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान कंचनकडून दोन मोटरसायकली येत असताना दिसल्या. तेवढ्यात दोन्ही मोटरसायकलस्वारांनी पोलिसांचं वाहन पाहताच आपल्या दुचाकी वाहन वळवलं आणि पळू लागले.
इंगळे यांच्या हे निदर्शनास येतात त्यांनी आपल्याला पाहताच का पळ काढला याचा विचार केला आणि त्यांच्या मागे पाठलाग करू लागले. त्यानंतर समोरून एक अॅम्बुलन्स सायरन वाजवत येत होती,त्यामुळे मोटरसायकल स्वारांना समजलं की आपल्याला
दोन्हीकडून पोलिसांनी घेरलं. अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने हवेत गोळीबार केला, आणि मोटरसायकल जोरात पळवली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पांठलाग सुरू ठेवला. गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी दोन्ही पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. परंतु रस्ता
खराब असल्यामुळे चारचाकी वाहन चालवण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर कंचनपून पर्यंत त्यांचा पाठलाग कायम सुरू ठेवला, नंतर त्यांच्या मोटर सायकली पोलिसांच्या नजरेसमोरून गायब झाली.
सुदैवानं उरळ पोलिसांच्या वाहनाचे अंतर दुचाकी पासून शंभर मीटर पेक्षा अधिक असल्याने त्यांच्या बंदुकीचा निशाणा हुकला, अन् दोन्ही पोलिस कर्मचारी बचावले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता अकोला जिल्ह्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, बाळापूर उप विभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज हे उरळ पोलिस स्टेशन येथे तळ ठोकून बसले असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे त्यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली असुन योग्य तो तपास करून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांवर गोळीबार करण्यात आला ती बंदूक शिकारी साठी वापरण्यात येणारी होती की गोळ्या झाडणारी खरी होती अंधार असल्या मुळे याचा आतापर्यंत तपास लागला नाही मात्र पोलिसांवर
बंदूकीने हल्ला करण्यात आला ही बाब तेवढीच खरी असून आता पोलिस तपासा अंतीच काय ते समोर येईल





