भावाच्या मुलीशी भावकीतील मुलाशी असणारे प्रेमसंबंधातून काकानेच काढला प्रियकराचा काटा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खुनाचा गुन्हा अजिंठा पोलिसांकडुन 24 तासात केला उघड ,आरोपीस केले जेरबंद….

अजिंठा(छत्रपती संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ३  रोजी पोलिस ठाणे अजिंठा हद्दीतील हळदा येथील राजु तोताराम गवळे यांनी त्यांचा मुलगा सतिष राजु गवळे हा रात्री शेतात जातो असे सांगुन गेला तो अद्याप पर्यत घरी परत आला नाही, अशा तक्रारीवरुन मुलगा हरवला बाबत तक्रार दिली होती.  तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले असता दिनांक
०४/०२/२०२४ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास हळदा येथील कैलास करघे यांचे शेतात एक तरुण मुलाचे शव  असल्याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली यावरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देवून मयताचे शरिराची बारकाईने पाहणी केली असता ही आत्महत्या नसुन घातपात झाले बाबत संशय पोलिसांना आला होता.





या अनुषंगाने मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार म्रुतक सतिष गवळे याचे मरणाचे कारणाचे पोलिस कसोशिने शोध घेत असतांना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, म्रुतक सतिष गवळे याचे हळदा गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध आहे. तसेच तिला बोलण्यासाठी त्याने त्याचे नावावर तिला मोबाईल फोन चे सिमकार्ड सुध्दा घेवुन दिलेले आहे. या माहितीचा धागा पकडुन पोलिसांनी तपासास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेषण व संशयाचे आधारे अल्पवयीन मुलीचा काका याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचेकडे म्रुतक मुला विषयी
विचारपुस केली असता तो पोलिसांना उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावला त्यास विश्वासात घेवुन कसोशिने मयताबाबत विचारपुस करता त्यांने सांगितले कि, दिनांक ०२/०२/२०२४ च्या मध्यरात्री ११:०० वा चे  सुमारास म्रुतक सतिश गवळे हा त्याची पुतणी हिला भेटण्यासाठी आला असतांना त्याची चाहुल लागल्याने त्याने झोपेचे सोंग घेवुन तसाच निपचित पडुन राहिला होता. यावेळी सतिश याने मुलीच्या घराचे दिशने ईशारा करुन तो पुढे निघुन गेला व थोडया वेळाने पुतणी ही सुध्दा घराबाहेर येवुन तो ज्या दिशेने गेला त्याच दिशेला ती जात असल्याचे त्यांने पाहिले त्यामुळे त्याचा लपुन पाठलाग केला असता ते शेतातील एका कोप-यात बसलेले त्यांला दिसले. यावेळी राग अनावर झाल्याने त्याने शेतातील दगड उचलुन त्यांचे दिशेने भिरकवला असता पुतणी ही घाबरुन तिचे घराचे दिशने पळुन गेली
तर म्रुतक सतिश हा त्याचे शेतातचे दिशने पळुन जावु लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडुन खाली पाडुन जवळ पडलेला दगडाने त्याचे डोक्यात वार केले व नंतर त्याला जवळच असलेल्या कैलास करघे यांचे विहीरीत फेकुन दिले जेणे करून त्यांने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे असा लोकांचा समज होईल.
परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफिने ही आत्महत्या नसून अल्पवयीन पुतणी सोबत असलेल्या प्रेमसंबधाचे कारणावरून त्याचा खुन केला असल्याचे निष्पन्न करून आरोपीचा बनाव हा उघड केला व यातील म्रुतक  सतिश राजु गवळे वय २६ वर्षे रा. हळदा ता.सिल्लोड याचे खुनाचे गुन्हयात अल्पवयीन मुलीचा काका यास अटक केली असुन त्याचे विरुद्ध पोलिस ठाणे अजिंठा येथे भादंवी कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदरची  कारवाई ही मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक,डॉ. दिनेश कुमार कोल्हे, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिल्लोड यांचे मार्गदर्शनाखाली अमोल ढाकणे,स.पो.नि.शरद वाघुले, पोउपनि, पोलिस अंमलदार अक्रम पठाण, संदीप कोथलकर, भागवत शेळके, अरुण गाडेकर,
सुरेखा काळे, संजय कोळी यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!