स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारे ईंदिरानगर पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणार्या स्पा सेंटरवर पोलिस उपायुक्त व ईंदीरानगर पोलिसांचा छापा ,पिडीतेंची केली सुटका…..





नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिंनाक
०५/०३/२०२४ रोजी माोनिका राउत, पोलिस उपायुक्त परिमंडळ
०२ नाशिक शहर यांना मिळालेल्या बातमी नुसार शेखर देशमुख सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,अशोक कुमार शरमाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक शहर, पोलिस उप निरीक्षक संदिप पवार यांनी छापा पथक तयार
करून कर्मा हिलकीस्ट बिल्डींग पाथर्डीरोड इंदिरानगर नाशिक या बिल्डींगच्या पहील्या मजल्यावरील चालु असलेल्या स्पा सेन्टर मध्ये ठेवलेल्या महिला /मुलींना वरील नमुद बिल्डींग मध्ये स्पा सेंटर च्या नावाखाली त्यांचे कडुन वेश्या व्यवसाय करण्यात येतो. अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा कारवाई करणे कामी सदर ठिकाणी जावुन बनावाट ग्राहक पाठवुन खात्री करून ०८:१५ वा. छापा टाकला असता सदर ठिकाणी १) आयेशा आजिम कादरी
३८ वर्षे रहा. स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक २) शुभम चव्हाण, व मदतनीस ३)विजयकुमार नायर वय – ४३ वर्षे रहा. श्री आर्केड अपार्टमेंट,फ्लॅट नं. २२ दामोदर नगर नाशिक,४) सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी वय ३४ वर्षे रहा. काझीमंजील सुखदेवनगर पाथर्डीगांव नाशिक, ५) अजय बबलु चव्हाण वय ३३ वर्षे रहा. वेदांत पार्क रोहाउस नं. ५ दामोदर नाशिक, ६) रवि कोंडाजी मुठाळ वय २७ वर्षे रा. लहवित बाजगीराफाटा नाशिक व सदर ठिकाणी दोन पीडीत महीला मिळुन आल्याने सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालु असल्याची खात्री झाल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन पुढील कारवाई कामी सर्वांना ताब्यात घेउन इंदिरानगर पोलिस ठाणे येथे आणुन त्यांचे विरूध्द दिल्याने इंदिरानगर पोलिस ठाणे येथे गुरनं. ६४/२०२४ भादविक ३७०, ३४ सह कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ प्रमाणे फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करून गुन्हयांतील वरील नमुद आरोपींना अटक करण्यात आली असुन गुन्हयांचा पुढील तपास सपोनि  निखील बोंडे इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक शहर हे करीत आहे.
सदरची कारवाई  संदिप कर्णीक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर, मोनिका राउत, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०२ नाशिक शहर, शेखर देशमुख सहा.पोलिस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली अशोक कुमार शरमाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक शहर सपोनि निखील बोंडे,पोउनि संदिप पवार, मपोउनि बारेला, पोहवा  जावेद खान, पोशि मुशरीफ शेख, चंद्रभान पाटील, मपोशि  धनवंता राउत, सोनवणे असे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!