MD ड्रगसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

रामनगर परिसरात एकास  एम.डी (मेफोड्रॉन)पावडर सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने दिनांक 02/04/2024 रोजी मुखबिरव्दारे खबर मिळाली की, एक ईंसम नामे शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर हा त्याचे खाजगी मोटारसायकल ने एम.डी
(मेफोड्रॉन) पावडर घेवुन विक्री करीता बंगल खिडकी गेट वर येणार आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने सदर खबरेची माहिती.महेंश कोंडावार, पोलिस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपुर यांना देवुन सदर खबरेची शहानिशा करण्यासाठी सदर ठिकाणी जावुन शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याची
अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशात मध्ये एम.डी (मेफोड्रॉन) पावडर वजन 7.68 ग्रॅम व एक होडा अॅक्टीवा असा एकुण 53,040 /- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पोस्टे रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले.





सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका,अपर पोलिस अधीक्षक रीना जंनबधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले, पोलिस अंमलदार संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे,अमोल सावे, गोपाल आतकुलवार, चालक पोलिस अंमलदार ऋुषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!