
मोहादारुची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे तावडीत सापडला….
गावठी मोहा दारुची चोरटी वाहतुक करणारा डी बी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह गावठी मोहा दारु केली जप्त…..
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे दिनांक 07/10/2024 रोजी रात्री पोस्टे परिसरात दुर्गा उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना खबरी कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की,खैराटी पारधी बेडा येथील सुनील भोसले हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक MH 32 AU 6327 वाहनाने अवैदयरित्या गावठी मोहा दारूची हिंगणघाट येथे खेप घेऊन येणार आहे


अशा खात्रीशीर माहितीवरुन सदर माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने हिंगणघाट वणा नदीचे पूलासमोर पथकासह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे मोपेड वाहन क्रमांक MH 32 AU 6327 गाडीने गावठी मोहा दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने त्यास पथकाचे मदतीने नाकाबंदी करून थांबविण्याचा इशारा केला चालकाने त्याचे ताब्यातील वाहन थांबवले सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले.त्याने त्याचे नाव सुनील भोसले वय 44 वर्ष रा. खैराटी पारधी बेडा असे सांगितले.

त्यावरुन त्यास पंचासमक्ष मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदान मध्ये ठेवून असलेल्या चुगडी मध्ये 03मोठ्या प्ल्यास्टिक पन्नीमध्ये 30 लिटर व डिक्कीमध्ये 03 मोठ्या प्लास्टिक पणयामध्ये 30 लिटर प्रमाणे एकूण 60 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 6,000/- रु. TVS ज्युपिटर शेंद्री रंगाची मोपेड वाहन जिचा नोंदणी क्र MH 32 AU 6327 किंमत 80,000/- रु. असा एकून 86,000/- रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आला पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलीस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक मनोज गभने ठानेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोउपनि . भारत वर्मा डि.बी. पथकाचे पो हवा प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे,पोशि आशिष नेवारे,विजय काळे यांनी केली. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.


