
सामाजिक सुरक्षा शाखेचा देहव्यापारावर छापा,२ पीडीत महीलांची सुटका…
नागपुर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचा कपीलनगर हद्दीतील Hotel Paradise Stay In येथील देहविक्री व्यवसायावर छापा,२ पिडीत मुलींची सुटका….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १८/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील अधिकारी व अंमलदार पोलिस स्टेशन कपीलनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, पुजा नावाची महिला ही व्हॉटसअप वरून ग्राहकांशी संपर्क साधून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता इतर शहरातील स्त्रियांना/मुलींना पैशाचे आमिष देवून देहव्यापारास प्रवृत्त करुन ग्राहकाकरीता स्वतः हॉटेल/जागा उपलब्ध करून वा त्यांना संबंधित हॉटेलची माहिती देवून त्यांना समागमाकरीता स्त्रिया/मुलीं उपलब्ध करून देवून संबंधित हॉटेलवर देहव्यापार करवुन घेतात.


सदरची माहिती वरिष्ठांना देवुन १८/१०/२०२४ रोजी दुपारी ४:१० वा. ते दिनांक १९/१०/२०२४ रोजी ते ००:३० वा. पर्यंत पो. ठाणे. कपिलनगर, नागपूर शहर हद्दीत हॉटेल Paradise Stay Inn रमाई नगर, कपिल नगर मेन रोड, पो. ठाणे. कपिलनगर, नागपुर शहर येथे पाळत ठेवुन केलेल्या छापा कारवाही दरम्यान ०२ पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. पिडीतांना विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, पुजा हीने दोन्ही पिडीत मुलींना पैशाची फार आवश्यकता आहे हे ओळखुन त्यान्वये त्यांच्या नाईलाजाचा फायदा घेवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले.

त्यांना त्याचे दलालाबाबत विचारले असता त्यांनी तीचे नाव श्रीमती पुजा प्रितम दहिकर, वय ३६ वर्ष, रा. नमो बुध्द विहार जवळ, न्यू इंदोरा झोपड पट्टी गल्ली नं. १०, पो. ठाणे. जरिपटका, नागपुर शहर असे सांगीतले. नमुद आरोपी महिलेचा सामाजिक सुरक्षा विभागाच्या दोन चमुंनी कसुन शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. तसेच हॉटेल Paradise Stay Inn चे चालक/मालक यशराज राजेन्द्र चौकसे, वय २९ वर्ष, रा. मानेवाडा बेसा रोड, शाहु नगर प्लॉट नं. १७, पो. ठाणे. हुडकेश्वर, नागपूर शहर याचे हॉटेलमधील मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये पुजाचा मोबाईल क्र सेव्ह होता.

तसेच तीचेशी व्हॉटसअॅप चॅटींग केलेली होती. याव्यतिरीक्त धाड टाकलेवर त्यांचेकडील खोलीच्या बुकींग एन्ट्रीत खाडाखोड केलेली होती. यावरून आरोपी पुजा यांचेशी हॉटेलचे व्यावसायीकाचे संबंध होते असे लक्षात आले.सदर छापा कार्यवाही दरम्यान घटनास्थळावरून एकुण १९,९६०/- रूपयाचा मुद्देमाल घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त केला असुन १) श्रीमती पुजा प्रितम दहिकर, वय ३६ वर्ष, रा. नमो बुध्द विहार जवळ, न्यू इंदोरा झोपडा गल्ली नं. १०, पो. ठाणे. जरिपटका, नागपुर शहर २) यशराज राजेन्द्र चौकसे, वय २९ वर्ष, रा. मानेवाडा बेसा रोड, शाहु नगर प्लॉट नं. १७, पो. ठाणे. हुडकेश्वर, नागपूर शहर यांचेविरूध्द पोलिस ठाणे कपिलनगर, नागपूर शहर येथे अप. क्र. ३९१/२०२४ कलम १४३, ३(५) भारतीय न्याय संहीता सहकलम ४, ५, ७ (अ) अनैतीक व्यापार प्रतीबंधक कायदा-१९५६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढिल तपास पोलिस ठाणे कपील नगर हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविन्द्र सिंग, सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), राहूल माकणीकर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), अभिजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर, सपोनि शिवाजी ननावरे, पोहवा प्रकाश माथनकर, सचीन बढिये, लक्ष्मण चौरे, नापोशि अजय पौनीकर, शेषराव राऊत, पोशि अश्विन मांगे, मपोहवा लता गवई, मपोनाशि आरती चव्हाण यांनी केली


