
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरी परीसरात पकडला मुंबईला जाणारा गांजाचा साठा….
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरी हद्दीत पकडला अंमली पदार्थ गांजा,२९ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात….
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(.25) ॲाक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे बोरी परीसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर खबर दिली कि, वर्धा ते नागपूर मार्गावरील समृद्धी हायवे रोड जवळील जीत धाब्याजवळ दोन इसम येणार असून त्यांचे जवळील लगेज बॅगमध्ये अंमली पदार्थ गांजा भरून आहे व ते मुंबई येथे घेऊन जाणार आहे,


अशा प्राप्त खबरेची शहानिशा करुन स्थागुशाचे पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद दोन इसमाना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अनुक्रमे 1) अगणु गोपाळ वर्मा, वय 46 वर्ष, रा. शाहू नगर बेसा रोड मानेवाडा जि. नागपुर 2)कुंदन शंकर इंगोले वय 29 रा धिवरपूरा घाट रोड, जुनी मंगळवारी नागपूर असे सांगीतले त्याचेकडील बॅगची झडती घेतली असता त्याचे कडे 1) 29 किलो 219 ग्राम अंमली पदार्थ गांजा, कि. 2,92,190/- रू 2) 2 मोबाईल कि 25000/- रु 3) 2 लगेज बॅग कि 4000/- असा एकुण 3,21,190/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,नागपुर दीपक अग्रवाल,स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा.पो.नि.किशोर शेरकी, सागर गोमाशे, पोउपनि बट्टूलाल पांडे,स फौ मिलींद नांदुरकर, पो.हवा संजय बांते, मयूर ढेकले, आशिष भुरे,पोशि धोंडुतात्या देवकाते, रोहित आडे, चालकपोशि सुमित बांगडे, आशुतोष लांजेवार, वसंत राठोड यांनी पार पाडली.



