समुद्रपुर हद्दीत अवैध दारु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 डिसेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  चे पथक पोलिस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, झडती दरम्यान घराचे आतील रूममध्ये कोप-यात 04 खरर्ड्याचे खोक्यात व 3 प्लास्टीक पन्नीमध्ये तसेच फ्रिजमध्ये एका कापडी पिशवीमध्ये देशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा मिळुन आल्य





सदर बाबत तिला चौकशी केली असता सदरचा दारू माल हा अजय हजारे व साहिल डुमार यांनी आणुन दिल्याचे सांगीतले यावरुन जागीचं पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन देशी दारू कोकण संत्रा कंपनीच्या 90 एम.एल.च्या 800 सिलबंद शिशा कि 80,000/- रू व एक सिल्व्हर रंगाची Haier कंपनीचा फ्रिज कि. 12,000/- रू असा जु.कि. 92,000/-  रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असुन आरोपी 1) छाया रमेश खोबरे, वय 60 वर्ष, रा. वायगाव हळद्या तह. समुद्रपुर, 2) अजय हजारे, रा. सातगाव बुट्टीबोरी, 3) साहिल डुमार रा. समुद्रपुर यांचेवर पोलिस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आह्



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखे चे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पोहवा अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अखिल इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!