
संशईत ईसमास ताब्यात घेऊन ईलेक्ट्रिक वायर बंडल चोरीचा गुन्हा सिटी कोतवाली पोलिसांनी केला उघड….
लोहीया कंम्पाउंड, येथील ईलेक्ट्रीक वायर बंडल चोरीतील अज्ञात आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात,वायर चोरीचा गुन्हा केला उघड…..
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ६ रोजी लोहीया कंम्पाउंड, खोलेश्वर, अकोला येथे राहणारे राजेश सत्यनारायाण लोहीया वय ५६ यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की दि.०१/०२/२०२५ चे ०७/०० वा ते दि. ०५/०२/२०२५ चे ११/०० वा दरम्यान लोहीया कंम्पाउंड, खोलेश्वर, अकोला येथे असलेले त्यांचे कार्यालयातील स्टोअर रूम मध्ये ठेवलेले ईलेक्ट्रीक वायरचे वेगवेगळे कंपनीचे एकुण ४७ बंडल किंमत अंदाजे ३,११,९५८/- रूपये चा मुदद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून गेला आहे असे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अपराध कंमांक. ४३/२०२५ कलम ३०५ (अ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


सदर गुन्हयाचे तपासात गुप्तबातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून पो.स्टे. सिटी कोतवाली येथील डि.बी. पथकाने सदर गुन्हयात आरोपी विजय अंबादास उंबरकार, वय ३९ वर्षे रा. शिवसेना वसाहत, अकोला यास निष्पन्न करून त्यास ताब्यात घेऊन त्याची कसुन चौकशी केली असता सदर आरोपीच्या ताब्यातुन विविध कंपनीचे एकुण २७ बंडल किंमत अंदाजे २,००,५०० रू चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, अकोला सतीश कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस स्चेशन सिटी कोतवाली पोलिस निरीक्षक सुनिल किनगे, पोहवा, अश्वीन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येउल, पोशि निलेश बुंदे,शैलेश घुगे पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला यांनी केली आहे.



