
भर रस्त्यात पोस्टमास्टर यांना लुटणारे आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथुन घेतले ताब्यात,जबरी चोरीचा गुन्हा केला उघड…
यवतमाळ येथे मुख्य रस्त्यावर दिवसा ढवळया झालेल्या जबरी चोरीतील 05 अज्ञात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथुन केली अटक,गुन्हा केला उघड….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि १३ मे २०२५ रोजी सकाळी अंदाजे १०/३० वाजताचे दरम्यान बाभुळगांव येथील पोस्ट ॲाफीसमधे पोस्टमास्तर असलेले श्री. सुभाष नारायण बारसे, वय ५९ वर्ष, रा. तिरुपती नगर लोहारा यवतमाळ हे नेहमीप्रमाणे त्यांचे दुचाकी ऍक्टीव्हा वाहनाने यवतमाळ येथील मुख्य पोस्टऑफीस मध्ये पोस्टासंबंधीत शासकीय व्यवहाराकरीता येऊन येथुन नगदी ७,००,०००/- रुपये काढले ज्यामध्ये ५००/- रु दराच्या नोटांचे १४ बंडल असलेले आपल्या एक्टीव्हा वाहनाचे डिक्कीमध्ये ठेवुन बाभुळगांव पोस्टऑफीस येथे जाणेकरीता यवतमाळ ते बाभुळगांव रोडने निघाले असता करळगांव घाटात फिर्यादीचे पाठीमागुन येणाऱ्या शाईन मोटारसायकल वरील दोन अज्ञात इसमांनी पोस्टमास्तर बारसे यांना अडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांचे ताब्यातील एक्टीव्हा वाहन व वाहनातील रक्कम घेऊन पसार झाले होते. सदर घटनेसंबंधाने फिर्यादी श्री. सुभाष बारसे यांनी पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द अपराध क्रमांक ५५०/२०२५ कलम ३०९ (४), ३ (५) भान्यासं अन्वये नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदरचा गुन्हा उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके तांत्रीक व गोपनिय माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याकरीता प्रयत्नशील होती. सदर पथकांनी गोपनिय बातमीदार सुध्दा सतर्क केले होते. त्यातुनच स्था.गु.शा.पथकास यवतमाळ येथील इसम १) राजेश ठोंबरे व २) रुतीक तुरणकर यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचा संशय असल्याने त्यांचे बाबत गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन स्था.गु.शा. पथकाने तांत्रीक माहितीचे आधारे ३) पियुष कावळे, ४) प्रतिक घरात, व ५) सावन पंचभाई असे तिघे सुध्दा त्यांचे सहकारी असल्याचे निष्पन्न केले तसेच पियुष कावळे हा ग्रामीण डाक सेवक म्हणुन पोस्ट ऑफीस बाभुळगांव येथे कर्तव्यावर असल्याने व काही दिवसांपासुन सुट्टीवर असल्याची माहिती प्राप्त झाली तसेच गुन्हयातील फिर्यादी यांची दुचाकी एक्टीव्हा वाहन हे पोलिस स्टेशन कळंब हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आले.

त्याअनुषंगाने नमुद पाचही ईसमांचे मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता त्यांचा आपसात संपर्क असल्याचे व त्यामधील चार ईसम हे सध्या पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने स्था.गु.शा. पथकाने तात्काळ पुणे येथे रवाना होऊन १) पियुष दिपक कावळे, वय २४ वर्ष, रा. सुरभी नगर यवतमाळ, २) राजेश अवधुत ठोंबरे, वय ४९ वर्ष, रा. बालाजी पार्क यवतमाळ, ३) प्रतिक उत्तम घरात, वय २१ वर्ष, रा. सुरभी नगर यवतमाळ, ४) रुतीक संजय तुरणकर, वय २४ वर्ष, रा. विठ्ठलवाडी यवतमाळ यांना पुणे येथुन तर त्यांचा साथीदार ५) सावन शाम पंचभाई, वय २० वर्ष, रा. वाघापुर यवतमाळ यास यवतमाळ येथुन ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन केलेल्या तपासात नमुद आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली.

नमुद आरोपींकडुन नगदी ६,५९,०००/- रु व गुन्हा करणेकरीता वापरलेले शाईन व स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल अशी दोन वाहने एकुण ७,१९,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिश चवरे पोउपनि गजानन राजमल्लु, पोलिस अंमलदार से साजीद से हाशम, बंडु डांगे, रुपेश पोली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, कविश पाळेकर, आकाश सहारे, आकाश सुर्यवंशी दिगांबर पिलावर, देवेंद्र होले, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली


