
खाकीचा गौरव! नागपूर शहर पोलीस दलाला स्वातंत्र्यदिनानिमित्त मानाची सेवा पदके जाहीर
नागपूर: स्वातंत्र्यदिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण व निष्कलंक सेवेची दखल घेत केंद्र व राज्य शासनाकडून विविध सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे.
१. राष्ट्रपती सेवा पदक (President’s Police Medal)
भारत सरकार व मा. राष्ट्रपती यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रपती सेवा पदकाने २ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे:

-
वैभवकुमार गागदेव जाधव (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा-२)
-
राजकुमार यादवराव जनबंधू (पोहवा, पोलीस ठाणे कपिलनगर)

⭐ २. अतिउत्कृष्ट सेवा पदक (Ati Utkrisht Seva Padak)
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १४ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे: १. विश्वास नांगरे पाटील (पोलीस आयुक्त) २. नविनचंद्र रेड्डी (सह पोलीस आयुक्त) ३. राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे) ४. नरेंद्र हिवरे (सहायक पोलीस आयुक्त, अजनी विभाग) ५. महेश आंधळे (पोलीस निरीक्षक, नवीन कामठी) ६ राजेश तुकाराम पैदलवार (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा) ७. सुनिल गोपीनाथ जाधव (पोउपनि, वाहतूक शाखा) ८. किशोर माणिकराव मालोकर (पोउपनि, बेलतरोडी) ९. विजय खुशालराव पंचभाई (सफो, वाहतूक शाखा) १०. अनिल संतोषराव तुमसरे (सफो, पो.ठा. भांडेवाडी) ११. दिनकर वासुदेव चांभारे (पोहवा, पो. मुख्यालय) १२. नितीन काशीराम वानखेडे (पोहवा, विशेष शाखा) १३. सचिन तुळशीराम मांडळे (पोहवा, विशेष शाखा) १४. पंकज पुरुषोत्तम धांदे (पोहवा, गुन्हे शाखा)

३. उत्कृष्ट सेवा पदक (Utkrisht Seva Padak)
गृह मंत्रालयाकडून १७ पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे: १. श्री. मुकुंद सुखदेवराव कवाडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लकडगंज) २. श्री. ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोजकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर) ३. श्री. रितेश रत्नाकर आहेर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बेलतरोडी) ४. श्री. निलेश चंद्रकांत घोगरे (पोउपनि, कळमना) ५. श्री. विजय वसंतराव कुंभलकर (पोहवा, पो. मुख्यालय) ६. श्री. रविंद्र विश्वनाथ धुरें (पोहवा, पो. मुख्यालय) ७. श्री. विजय तुकाराम लोनबळे (पोहवा, पो. नियंत्रण कक्ष) ८. श्री. रत्नाकर शामलाल वलके (पोहवा, आर्थिक गुन्हे शाखा) ९. श्री. कमलाकर गुलाब भंगाळे (पोहवा, विशेष शाखा) १०. श्री. विजय हरीचंद्र वाडे (पोहवा, बीडीडीएस शाखा) ११. श्री. रविंद्र विठोबा खिराडे (पोहवा, बिनतारी संदेश विभाग) १२. श्री. सचिंद्र त्र्यंबकराव चौधरी (पोहवा, गुन्हे शाखा) १३. श्रीमती वैशाली भास्करराव शेंडे (मपोहवा, एमआयडीसी) १४. श्री. हर्पदीप बैजनाथ खोब्रागडे (पोहवा, तहसिल) १५. श्री. सचिन मोरेश्वर ठोंबरे (पोहवा, पो. मुख्यालय) १६. श्री. अरूणकुमार लल्लुराम भारती (पोहवा, पो. मुख्यालय) १७. श्री. मंगेश शिवकुमार मापारी (पोअं, गुन्हे शाखा)
४. विशेष सेवा पदक (Special Service Medal)
पोलीस महासंचालकांतर्फे २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे: १. नितीन अशोक मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाडी) २. निलेश बकाराम उरकुडे (सहायक पोलीस निरीक्षक, अंबाझरी)

५. खडतर सेवा पदक
पोलीस महासंचालकांतर्फे १ अंमलदाराला खडतर सेवा पदक जाहीर झाले आहे:
-
मधुकर अवधुत (पोलीस उपनिरीक्षक, डॉग युनिट)
पुरस्कार प्रदान सोहळा
सर्व सन्मानित वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदारांना १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्यदिना दिवशी) ध्वजारोहण सोहळ्यानंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.





