
अंमली पदार्थ अफु विक्रीकरीता बाळगणार्यावर विसरवाडी पोलिसांची मोठी कार्यवाही…
अंमली पदार्थ अफुची बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने बाळगणाऱ्यावर विसरवाडी पोलिसांची कारवाई, 19,98,875 रु मुद्देमाल केला हस्तगत…..
नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्याच्या काळात नशेच्या आहारी जाणारी तरुन पिढी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक श्रावण दत्त यांनी अंमली पदार्थ बाळगणारे तसेच विकणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते


त्याअनुषंगाने दि 17 मे 2025 रोजी विसरवाडी पोलिसांना गोपनीय माहीती मिळाली पोलिस ठाणे हद्दीतील गंगापुर गावाचे शिवारात सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलच्या पटांगणात ट्रॉला क्रमांक GJ 27 TD 3586 हिचेवर चालक याने त्याचे ताब्यातील ट्रॉलीचे मागील बाजुस बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर परिणाम करणाऱ्या अफूचे फुलांची बोंडयाची पिशव्या स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्री करण्याचे उद्देशाने ठेवलेल्या आहेत, अशा गोपनीय माहितीवरुन मिळाल्याने पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे व पथक अशांनी मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे विसरवाडी हद्दीतील गंगापुर गावाचे शिवारात सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलचे पटांगण परिसरात जाऊन शोध घेतला असता तेथे एक अशोक लेलैंड कंपनीचा ट्रॉला क्रं. GJ 27 TD 3586 हा मिळुन आला.

सदर वाहनावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रुपचंद केसाराम, वय 36 वर्षे, रा.नाथानियो का वास, ता.जि.बाडमेर, राजस्थान असे सांगितले. त्यास ट्रॉलाचे मागील बाजुस काय आहे बाबत विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्यावर संशय अधिक बळावल्याने त्याचे वाहनाची तपासणी करता त्यामध्ये ताडपत्रीचे आत 4 प्लॅस्टीकच्या पिशव्या आढळून आल्या. सदर पिशव्या उघडुन पाहता त्यामध्ये अफुच्या फुलांचे बोंडाचे चुरा (अंमली पदार्थ) पथकास मिळुन आल्याने सदर आरोपीस लागलीच पोलिस पथकाने ताब्यात घेतले.सदर ट्रॉलातुन एकुण 99 किलो 775 ग्रॅम वजनाचा अफुच्या फुलांचे बोंडाचे चुरा उर्ग वास असलेला अंमली पदार्थ व वाहन असा 19,98,875/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच ट्रॉला चालक आरोपी रुपचंद केसाराम, वय 36 वर्षे, रा.नाथानियो का वास, ता.जि. बाडमेर, राजस्थान याचेविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाणे येथे गु.र.नं.- 151/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8 (क), 18(क), 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोउपनि किरण पाटील, विसरवाडी पो. ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधिक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोउपनि किरण पाटील नापोशि अनिल राठोड, पोशि निखील ठाकरे, लिनेश पाडवी, रामचंद्र ठाकरे, दिनेश पावरा यांनी केली


