अमरावती शहरात चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणारे आरोपी गजाआड; गुन्हे शाखेकडून मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहरात चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटणारे ३ आरोपी गजाआड; गुन्हे शाखेकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

अमरावती: किराणा दुकानात साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत सोन्याची साखळी जबरीने हिसकावून नेणाऱ्या ३ आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने अतिशय कौशल्याने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.



चॉकलेट व चिप्स मागून केला होता वार ९ जुलै २०२६ रोजी गजानन नगर येथील ६० वर्षीय उषा लक्ष्मण वऱ्हाडे या त्यांच्या घरच्या किराणा दुकानात असताना दोन अज्ञात इसम तिथे आले. त्यांनी चॉकलेट आणि चिप्स विकत मागितले. फिर्यादी महिला साहित्य देत असतानाच, एका आरोपीने त्यांना थेट चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुन्हे शाखेची धडक कारवाई गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी आरोपींना नांदगावपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.



अटक करण्यात आलेले आरोपी:

१) सुमित उर्फ विक्की देवानंद ढोके



 २) सुशिल प्रवीण मेश्राम

 ३) रोहित लोमेश काळे



एकूण २,९१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त:

  • १,९६,००० रुपये किमतीची सोन्याची लगड (१४ ग्रॅम २० मि.ली.)

  • ८०,००० रुपये किमतीची विना क्रमांकाची ओला इलेक्ट्रिक मोपेड

  • १५,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल

सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके, प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर आणि नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!