काटोलमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई; ₹७३,५१० चा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई: काटोल हद्दीतील हॉटेलवर धाड, ₹७३,५१० चा मुद्देमाल जप्त

स्थानिक प्रतिनिधी / काटोल:

नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशन काटोल हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत अवैध देशी व विदेशी दारूच्या विक्रीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ₹७३,५१०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, मौजा मोहगाव ढोले खैरी डॅम जंगल परिसरात असलेल्या ‘अज्जु फॅमिली रेस्टॉरंट’ येथे कोणत्याही प्रकारचा बार किंवा दारू विक्रीचा परवाना नसताना अवैध देशी व विदेशी दारूची विक्री सुरू होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून धाड टाकली.

रेस्टॉरंटमध्ये चौकशी केली असता, तेथील मॅनेजरने मालकांच्या सांगण्यावरून हा परवाना नसताना दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे कबूल केले. पंचसमक्ष रेस्टॉरंटची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा आढळून आला.



अटक आरोपींची माहिती:

१. सुभाष गोविंद सोमकुवर (वय ४८ वर्ष, रा. बानाबाकोडा, सौसर, जि. पांढुर्णा, मध्य प्रदेश; ह. मु. मोहगाव ढोले) – मॅनेजर

२. यश उर्फ अज्जू सुधीर वानखेडे (वय २५ वर्ष, रा. वानाडोंगरी हिंगणा, नागपूर) – रेस्टॉरंट/बार मालक



३. अतुल चंपतराव वानखेडे (वय ५७ वर्ष, रा. भाकरे ले आऊट, नागपूर) – सह-मालक/चालक

जप्त केलेला मुद्देमाल:

  • देशी दारू: ४८ निपा (किंमत ₹३,८४०/-)



  • विदेशी दारू (विविध कंपन्यांची): २७९ निपा (किंमत ₹५६,७९०/-)

  • नगदी रक्कम: ₹८,०००/-

  • इतर साहित्य

  • एकूण जप्त मुद्देमाल: ₹७३,५१०/-

पोलीस कारवाई:

या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन काटोल येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!