अमरावती: घरफोडीचा पर्दाफाश, एक आरोपी अटकेत तर ६,५९० रुपये व गाडी जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती

शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ ने कौशल्यपूर्ण तपास करत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून ६,५९० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  बालाजी मंगल कार्यालयाजवळ, नंदनवन कॉलनी येथील रहिवासी ऋषभ श्रीकांत खोडे (वय २३) हे बाहेरगावी गेले असताना २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ च्या सुमारास त्यांनी मोबाईलवर घरातील सीसीटीव्हीचे लाईव्ह फुटेज पाहिले. सीसीटीव्ही बंद दिसल्याने त्यांनी मित्राला घरी पाठवले असता, मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले आणि कपाटातील २,५०,००० रुपये चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



तपास आणि कारवाई :-

गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि बातमीदारांचे जाळे सक्रीय केले. २२ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे भानखेडा (खुर्द) येथील संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.



आरोपी आणि जप्त मुद्देमाल

  • अटक आरोपी: कुणाल हिरालाल पवार (वय २२ वर्षे, रा. भानखेडा खुर्द, अमरावती).



  • फरार आरोपी: हर्षल उर्फ पांड्या नारायण निबर्ते (वय २३ वर्षे, रा. कम्पासपुरा, बडनेरा).

  • जप्त मुद्देमाल (एकूण मूल्य ७६,५९० रुपये):



    • गुन्ह्यातील रोख रक्कम: ६,५९० रुपये.

    • वापरलेली बजाज CT-110X दुचाकी (क्र. MH 27-DQ-5406): किंमत ७०,००० रुपये.

सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!