कर्तव्यावर जात असतांना महीला पोलीस अधिकाऱ्यास वाळुच्या ट्रकने चिरडले,डावा पाय निकामी,प्रकुती चिंताजनक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती(प्रतिनिधी) –  दोन महिन्यांपूर्वी एका मद्यपी दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या
हद्दीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले आहे.अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियंका कोटावार यांचा
डावा पाय निकामी झाला. हा अपघात इतका भयानक होता की पायाचा चुरा झाला.त्यांना लागलीच लाहोटी रुग्नालयात नेण्यात आले व त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यात आले,पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ,उपायुक्त सागर पाटील,विक्रम साली यांनी लगेच घटनास्थळी भेट दिली व वेळोवेळी परीस्थितीचा आढावा ते घेताय

घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला पोलीस अधिकारी प्रिंयका कोतावार ह्या आपल्या कर्तव्यावर राजापेठ पोलिस ठाण्यात जात असताना हा अपघात घडला





 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!