
सराईत मोटारसायकल चोरटा सिटी कोतवाली पोलिसांच्या तावडीत सापडला,उलगडा झाला २८ मोटारसायकल चोरीचा…
सराईत मोटारसायकल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात,आरोपीकडुन एकुन २८ मोटारसायकल केल्या जप्त…
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 13/09/2023 रोजी फिर्यादी संजय शेषरावजी तरेकर वय 55 वर्ष, रा उत्कर्ष, नगर अमरावती येथे तक्रार दिली की ते त्यांची मोटार सायकल हिरो शाईन कंपनीची ची क्र MH 27 B C – 2658 कि 20000/- रू. ही घेवुन कॉटन मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी गेले व त्यांनी त्यांची मोटारसायकल हि पंचमुखी हनुमान मंदीरा जवळ अमरावती येथे लावुन ते कॉटन मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी गेले व काही वेळानंतर परत आले असता सदर मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे अप न 406 /2023 कलम 379 भा द वि चा गुन्हा नोंद केला
सदर गुन्ह्याचा तपास करित असताना यातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. 21/01/2024 रोजी गुप्त बातमीदाराचे माहितीचे आधारे यातील संशईत


संतोष देवराव बोबडे वय 38 वर्ष रा कुरुम ता मुर्तीजापुर जि अकोला

याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा नंतर मात्र पोपटासारखा बोलायला लागला व सदरची मोटारसायकल त्याने चोरल्याचे कबुल केले वरुन त्यास अटक करून त्याच्या कडुन गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल

1) हिरो शाईन कंपनीची गाडी क्र MH 27 BC-2658 किंमत 20,000/- रु
व इतर गुन्हातील मोटार सायकल फॅशन प्रो 8, होन्डा शाईन 7 ड्रिम युगा 1 बजाज डिसकवर 01 असा एकुण 17 मोटार सायकल असा एकूण किं. 7,70,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या नंतर दिनाक 23/01/2024 रोजी सदर आरोपीची पोलिस कोंठडी घेतली असता आरोपीने कबुली दिली की त्याने वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मेमोरडम जप्ती पंचनाम्या प्रमाणे आरोपी कडुन त्याने चोरी केलेल्या वेगवेगळ्या गुन्हातील 11 मोटार सायकली किंमत अंदाजे
5,50,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.किंमत 13,20,000/- नमुद आरोपी याच्या कडुन आजपावेतो 28 मोटार सायकली एकुण जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी , अमरावती शहर, उपायुक्त परीमंडळ – 2, सागर पाटील ,सहाय्यक पोलिस आयुक्त राजापेठ विभाग शिवाजीराव बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार वाकसे, पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर, पो उपनि एस एस चिपडे, सहा.पोउपनि रंगराव जाधव, पोहवा मलिक अहेमद, नापोशि आशीष इंगळेकर, प्रमोद हरणे, पोशि पंकज अंभोरे,आंनद जाधव,पिरु फकिरावाले, नरेद्र उगळे यांनी केली.


