विशेष मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा युनीट २ ची देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर कार्यवाहीचा बडगा…
देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर गुन्हे शाखा युनीट २ ची विशेष मोहिमेंतर्गत कारवाई…
अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती गुन्हे शाखा युनिट २ यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करीत गावठी दारू विक्री करणारे आणि तडीपार आरोपींवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचने नुसार गुन्हेशाखा युनिट-२ पथक अमरावती शहर चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे आदेशाने दि.३०मार्च ते ३१मार्च रोजी पावेतो गुन्हेशाखा युनिट २ चे पथक हे पोलीस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, मिळालेल्या गोपनीय माहीती च्या आधारे पोलीस ठाणे खोलापुरी गेट हद्दीमधे २ कारवाई, पोलीस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीमधे ४ कारवाई अवैध गावठी दारू विक्री करणा-यांवर करण्यात आल्या तसेच अमरावती शहरातुन तडीपार असलेल्या तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई ची विशेष मोहीम राबवुन खालील प्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.
आरोपी नामे – १) शिवा शेषराव सरदार (वय २५) रा. महाजनपुरा, २) अक्षय बाबाराव बोरकर (वय २७), ३) अश्विन नरेंद्र पारीसे (वय २६) दोन्ही रा.ग्राम सुकळी अमरावती, – खोलापुरी गेट पोलिस ठाणे (या नमुद तिन्ही आरोपीतांचे ताब्यातुन एकुण ६४ नग देशी दारू शिश्या ४,४८०/- रू, मोटार सायकल कि.अं. ७०,०००/- रू चा माल जप्त केला आहे
४) रहीम रहेमान चौधरी (वय ४०) रा.गवळीपुरा, अमरावती – फेजरपुरा पोलिस ठाणे, (नमुद आरोपीचे ताब्यातुन ५ लिटर गावठी हातभटी दारू कि.अं. १५००/- रू चा माल जप्त केला आहे.)
५) भारती संतोष मोहोकार (वय ३०) रा.वडाळी, अमरावती – फेजरपुरा पोलिस ठाणे, (नमुद महीला आरोपीवर रेड करून ती हातभटी काढतांना मिळुन आल्याने तिचे ताब्यातुन हातभटी काढण्याचे साहीत्यासह असा एकुण २९,९५०/- रू चा माल जप्त केला आहे.)
६) साहिल उर्फ गोलुण अंभोरे (वय २३) रा. वरूण नगर महादेव खोरी अम, ७) प्रफुल अजय वानखडे (वय २०) रा. बिच्छु टेकडी अमरावती- फेजरपुरा पोलिस ठाणे, (नमुद दोन्ही आरोपी हे अमरावती शहर व ग्रामीण हद्दीतुन तडीपार असतांना सुध्दा ते शहरात अनाधिकृत प्रवेश करतांना मिळुन आल्यावरून त्यांचे कलम १४२ मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.)
८) प्रज्वल उर्फ पज्या प्रविण नाईक (वय २९) रा.यशोदा नगर अमरावती- फेजरपुरा पोलिस ठाणे, (याचेवर प्रतिबंध कारवाई करण्यात आली आहे.)
सदरच्या सर्व कारवाई ह्या पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त परीमंडळ-२, गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त मुख्यालय कल्पना बारावकर, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, मंगेश शिंदे, योगेश पवार, नईम बेग, राजीक रायलीवाले, शेखर रामटेके, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदिप खंडारे यांनी केली आहे.