चारचाकी वाहन ईर्टिगा चोरीच्या गुन्ह्याचा परतवाडा पोलिसांनी केला उलगडा,भागीदारच निघाला खरा सुत्रधार…
परतवाडा येथुन इटिंगा गाडी चोरणारे चोरटे परतवाडा पोलीसांच्या जाळ्यात…
परतवाडा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(04)जुलै 2024 रोजी रामनाथ हिरडे रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार यांची इटिंगा गाडी क्रमांक MH 04 JB 5259 ही चालक प्रफुल मोहोड हे चिखलदार येथे भाडे घेवून आले असता प्रवाशांना
जेवनाकरीता सायंकाळी पंजाबराव पाटिल ढाबा येथे थांबलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरांनी ढाब्यासमोर उभी केलेली इर्टिगा गाडी बनावट चाबीने सुरु करुन चोरुन घेवून गेले होते. त्याबाबत पोलीस स्टेशन परतवाडा येथे चालक प्रफुल मोहोड यांचे तक्रारीवरुन वरुन अप.क्र. 481 / 2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचा तपास ठाणेदार संदिप चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोस्टे. परतवाडा येथील डीबी पथकाने सुरु करुन तांत्रीक गोपनीय माहितीच्या आधारे यातील संशईत आरोपी मोहसीन खान अमरउल्ला खान रा. ताज नगर अमरावती यास ताब्यात घेवून विचारपुस केली व गुन्हयामध्ये चोरी गेलेली गाडी मारुती सुझुकी इटिंगा त्याचे घरा समोरुन जप्त करुन आरोपीस अटक केली. आरोपीचा पीसीआर प्राप्त करुन आरोपीस विश्वासात घेवून
विचारणा केली असता सदरची गाडी ही आरोपी मोहसीन खान याचा मोठा भाऊ मोबीन खान, त्याचे साथीदार तसेच अतुल काळे रा. धानोरा पुर्णा ह.मु. अमरावती यांचे मदतीने चोरी केल्याचे तसेच सदर गाडीची दुसरी चाबी हे भुषण टापरे रा. जवळा शहापुर याने दिल्याचे कबुल केले. यावरुन पोलिसांनी अनंता काळे व भुषण
टापरे यांना गुन्हयात अटक करुन आरोपीचे ताब्यातून गुन्हयात चोरी गेलेली इटिंगा गाडी MH 04 JB 5259, गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा क्रमांक MH 46 AP 9229, होंडा सिटी कार MH 02 AQ 8579, तसेच स्क्रॅप करण्याकरीता लागणारे कटर मशीन असा एकुण 17,13,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हयात चोरी गेलेली गाडी ही रामनाथ हिरडे याचे नावे आरोपी भुषण टापरे यांनी सन 2023 मध्ये फायनान्सवर पार्टनरशीपमध्ये विकत घेतली होती. परंतु गाडीचे हप्ते भरण्याकरीता पैसे जुळत नसल्याने ती गाडी त्यांनी प्रफुल मोहोड यास 1,00,000/- रुपयामध्ये विकली. प्रफुल मोहोड हा गाडी चे हप्ते भरत नसल्याने व फायनान्स कंपनी कडुन आरोपी भुषण टापरे यास वारंवार विचारणा होत असल्याने त्याने गाडी चोरी करण्याची योजना त्याचा मित्र अनंता काळे याचे सोबत मिळून आखली व गाड्या स्क्रॅप करणारा मोबीन खान याचे मदतीने गुन्हयातील गाडी चोरी केली.
यातील आरोपी मोबीन खान व मोहसीन खान हे त्यांचे राहते घरी भंगार खरेदी विक्रीचा व गाड्या स्क्रॅप करण्याचा व्यवसाय करत असुन गुन्हयात चोरी केलेली गाडी चे सुटे पार्ट करुन विक्री करण्याचे तयारीत असतांनाचा पोलिसांनी दखल देवून चोरी गेलेली गाडी आरोपी मोहसीन याचे ताब्यातून जप्त केली. तसेच गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी मोबीन खान व मोहसीन खान यांनी पो.स्टे. शेगांव येथुन तवेरा गाडी चोरी करुन स्क्रॅप केली असल्याचे कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींकडुन यापुर्वी सुध्दा आणखी काही गाड्या चोरी करुन स्क्रॅप केल्या असल्याचा संशय आहे. गुन्हयात आरोपी मोबीन खान अमरउल्ला खान रा. ताज नगर हा फरार असुन परतवाडा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपुर अतुलकुमार नवगीरे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोनि. संदिप चव्हाण, पोउपनि विठ्ठल वाणी, पोहवा. सचिन होले, पोहवा. सुधिर राऊत, पोहवा.उमेश सावरकर, नापोकॉ. मनिष काटोलकर, पोकॉ. विवेक ठाकरे, पोकॉ. जितेश बाबील पोकॉ. घनशाम किरोले यांनी केली.