पोल्ट्री फार्म मधुन मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसात पोल्ट्री फार्म मथुन मोठया प्रमाणात कोंबडया चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद  यांनी सदर गुन्हे उघडकिस आणुन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक पोलिस स्टेशन खालापुर येथील अप क्रमांक १९४/२०२३ कलम ४६१,३८० भा.द.वी चा समांतर तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरची चोरी हि नया घरकुल मुर्तीजापुर येथे राहनारा दानिश खान उर्फ राजा फिरोज खान याने त्याचे साथीदारासह केली आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून स्थागुशा  पथक मुर्तीजापुर येथे वरील पोलिस पथकासह  सह रवाना होवून दानिश खान फिरोज खान याचा मोबाईल क्रमांक व फोटो प्राप्त करून तांत्रीक पध्दतीने शोध घेतला असता तो तोलाराम चौक मुर्तीजापुर येथे मिळून आल्याने त्याला गुन्ह्यासंबंधाने ताब्यात
घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव

१) दानिश खान फिरोज खान वय २४ वर्ष, रा. नया घरकुल, मुर्तीजापुर





असे सांगीतले. त्याला गुन्हया सबंधाने विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली. त्यास पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने



२)पवन प्रल्हाद लसनकर, वय ३३ वर्ष, रा.पिंजर ता. बार्शी टाकळी  जिल्हा अकोला
३) महेमूद शहा मोहंमद शहा वय ३८ रा पठानपुरा मुर्तीजापुर



यांचे सहकार्याने गुन्हा केल्याची कबुली देवून सांगीतले की, त्याला पैशाची आवशक्यता असल्याने त्याने पोल्ट्री फार्म मधुन कोबडया चोरून आणण्याचे ठरवीले होते. त्यानुसार तो व त्याचा साथीदार सैयद समीर सैयद सलीम, रा. आकोट फाईल अकोला असे पोल्ट्री फार्म चोरी करण्यासाठी पाहणी करून आले होते. दिनांक २३/१०/२०२३ रोजी पोल्ट्री फार्म मध्ये कोंबडया चोरी करण्यासाठी महेमूद शहा मोहंमद शहा रा.पठानपुरा मुर्तीजापुर याची पिंजरा असलेली बोलेरो पिकअप गाडी सोबत घेवून तो व त्याचे साथीदार सैयद समीर सैयद सलीम, रा. आकोट फाईल अकोला, व शेख आमीर रा मुर्तीजापुर असे रात्री ११/३० वा मुर्तीजापुर येथुन
वलगाव ते खोलापुर रोडवरील रोडचे कडेला असलेल्या तिन पोल्ट्री फार्म पैकी मधात असलेल्या एका पोल्ट्री फार्म जवळ गाडी घेवून
गेले त्यापैकी शेख आमीर ला रोडवर पाहनी करण्यासाठी ठेवले होते. उर्वरीत दोघांनी त्या पोल्ट्री फार्म ला असलेल्या दरवाज्याचे कुलूप पेंचीस टाकुन तोडले व आत प्रवेश करून त्यामधुन अंदाजे २०० नग कोंबडया चोरून सोबत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीमध्ये टाकुन तिघे मुर्तीजापुर येथे आलेत व चोरी केलेल्या कोंबडया महेमूद शहा मोहंमद शहा याचे सांगण्यावरून ग्राम पिंजर येथील पवन लसनकर याला ४०,०००/- रू ला विकल्या व मिळालेले पैसे चौघांनी आपसात सारखे वाटून घेतले असे सांगीतले. तसेच त्याला अधिक विचारपुस केली असता त्याने अंजनगाव ते दर्यापुर रोडलगत असलेल्या मदरसा जवळ असलेल्या पोल्ट्री फार्म चे ताराची जाळी कापुन पोल्ट्री फार्म मध्ये प्रवेश करून त्यामधुन अंदाजे १५० नग कोबडया वरील साथीदाराचे मदतीने चोरून त्याचे बुलेरो पिकअप मध्ये टाकुन चोरून नेल्या असुन त्या चोरी केलेल्या कोंबडया सुध्दा महेमूद शहा मोहंमद शहा यांचे सांगण्यावरून ग्राम पिंजर येथील पवन लसनकर याला ३०,०००/- रू ला विकल्याचे सांगीतले. त्यांचे ताब्यातून

१) गुन्हयात रेकी करण्यासाठी वारलेली एक हिरो स्प्लेंडर
कंपनीचा मोटारसायकल क्रमांक एम.एच-३०- बी.एस-५७८८ किं.अं ६५,०००/- रू

२) गुन्हयात वापरलेला एक ओप्पो कंपनिचा मोबाईल किंमत अंदाजे १०,०००/- रू

३) कोंबडया विक्रीतून मिळालेले नगदी एकुण १९,३००/- रू

४) बुलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच-२९- बि.ई-२५२८ किंमत अंदाजे ५,००,०००/- रू. असा एकुन ५,९४,३००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात आरोपी  १) सैयद समीर सैयद सलीम रा. आकोट फाईल, अकोला २) शेख आमीर रा. मुर्तीजापुर हे दोघे फरार
असुन त्यांचा शोध घेने सुरू आहे.
अमरावती ग्रामीण अभिलेखावरील

पोलिस स्टेशन,खोलापुर अप क्रमांक १९४/२०२३ कलम ४६१,३८० भा.द.वी तसेच

पोलिस स्टेशन रहीमापुर येथील अप क्रमांक १८३/२०२३ कलम ४६१,३८० भादवी प्रमाने दोन गुन्हे उघड करण्यात आले असुन त्यांनी

पोलिस स्टेशन माना जिल्हा अकोला येथे सुध्दा पोल्ट्री फार्म मध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन खोलापुर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी  विशाल आनंद पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, विक्रम साळी अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांचे नेतृत्वात पो.उप निरीक्षक संजय शिंदे, पोलिस अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैयद अजमत, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, सागर धापड, चालक हर्षद घुसे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!