अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडक कारवाई: ५.७२ लाखांच्या मुद्देमालासह टाटा ४०७ वाहन आणि ३ आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंजनगाव सुर्जी :-

तालुक्यात तसेच परिसर हद्दीत घरफोडी व शेती साहित्याच्या वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹५,७२,५८० किमतीचा मुद्देमाल, चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा ४०७ वाहन जप्त केले असून, टोळीतील ३ मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.



पहाटेच्या सुमारास नाकाबंदीत सापडले आरोपी

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार व पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने टाकरखेडा नाका परिसरात पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास सापळा रचून कडक नाकाबंदी केली.



यादरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या एका टाटा ४०७ वाहनाला थांबवून तपासणी केली असता, वाहनात महावितरणचे (MSEB) आणि शेतातून चोरलेले तांब्याचे व अ‍ॅल्युमिनियमचे तार आणि इतर विद्युत उपकरणे आढळून आली.

अटक करण्यात आलेले आरोपी



१. मोहम्मद सुफियान अब्दुल कादिर (वय २५, रा. काझीपुरा, अंजनगाव सुर्जी) – चालक

२. मोहम्मद साजीद ताज मोहम्मद (वय ४५, रा. काझीपुरा, अंजनगाव सुर्जी) – भांड्याचे व्यापारी



३. शेख समीर शेख बशीर (वय २४, रा. सत्तीपुरा, अंजनगाव सुर्जी) – चोरीचा माल विकणारा मुख्य सूत्रधार

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील (एकूण मूल्य: ₹५,७२,५८०)

अ.क्र. जप्त साहित्याचा तपशील वजन / प्रमाण अंदाजे मूल्य (₹)
टाटा ४०७ चारचाकी वाहन (क्र. MH 04 DK 9088) १ वाहन ₹२,८०,०००
पाण्याच्या मोटरमधील कापलेले तांब्याचे तार १५६ किलो ₹१,८७,२००
जाळलेला तांब्याचा तार ४४ किलो ₹५२,८००
बोअरवेलमधील तांब्याचे तार २७.४ किलो ₹३२,८००
DP मधील तांब्याच्या पट्ट्या व इतर पार्टस २३ किलो ₹२७,६००
MSEB खांबावरील अ‍ॅल्युमिनियम तार ४४ किलो ₹९,२४०
पाण्याच्या मोटरचे तांब्याचे इतर साहित्य ३.६ किलो ₹४,३२०
जाळलेला अ‍ॅल्युमिनियम तार १२ किलो ₹२,५२०
मोटर सायकलचे व्हील ८ नग ₹१,६००
१० पितळीचे स्प्रिंकलर व नोझल ८ नग ₹१,५००

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

या कारवाईमुळे अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केबल चोरी, शेती पंप आणि महावितरणच्या साहित्याच्या चोरीचे अनेक जुने गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याप्रकरणी टोळीच्या इतर सदस्यांचा आणि खरेदीदारांचा शोध घेत आहेत.

तपास पथक:

ही मोहीम पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल हुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चांदोरे, पोउपनि भारत चिरडे, पोउपनि विशाल पोळ, तसेच पोलीस अंमलदार रवी राठोड, आकाश रंगारी, अमित घाटे व मोहसिन पठाण यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!