
सहाय्यक पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचे पथकाची अवैध धंद्याविरोधात धडक कार्यवाही…
तुमसर(भंडारा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १७/११/२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,तुमसर रश्मिता राव(भापोसे) यांना खात्रीशीर गुप्त माहीती मिळाली की सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जाणाऱ्या बावनथडी नदीच्या कोरड्या पात्रात बपेरा येथे काही लोक जुगार भरवून हारजीत चा खेळ करताय त्यावरुन स्वतः रश्मिता राव ह्या रात्री ८.०० वा चे सुमारास आपले अधिनस्थ असलेल्या पथकासोबत सदर ठिकाणी पोहचल्या असता त्याठिकाणी काही ईसम जुगार खेळतांना आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता
१) आशिष नागबैले


२)कुमार निनावे

३)ऊमराव राऊत

४)अनिल शेंद्रे
५)रसबैले
सर्व रा बपेरा
यांचे ताब्यातुन ताशपत्ते,मोबाईल,मोटारसायकल असा एकुन अंदाजे किंमत ५९२३२/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
त्याचप्रमाणे अवैध दारुच्या संबंधाने रेकार्डवरील दारुविक्रेते यांचेवर अचानक भयानक छापा कार्यवाही केली असता,दारुविक्रेती
१)उषा खोब्रागडे,बपेरा
२)गुनीता नागबैले,बपेरा
यांना ताब्यात घेऊन त्याचेकडुन दारु गाळण्याचे साहीत्यासह अंदाजे किंमत ७३८००/- रु चे जप्त करण्यात आले
सदरची धडाकेबाज कार्यवाही पोलिस अधिक्षक लोहीत मतानी,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी ,तुमसर रश्मिता राव(भापोसे)यांचे नेत्रुत्वात ठाणेदार पोलिस स्टेशन सिहोरा दिनेश गोसावी,पोलिस उपनिरीक्षक मुलचंद मेश्राम,नत्थु येडपाचे,तिलक चौधरी यांनी केली


