अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; तीन दुचाकी चोरासह जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

अमरावती: अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अमरावती ग्रामीण पथकाने मोटर सायकलींची चोरी करणारे आरोपी आणि बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे. १. मोटर सायकल चोराला अटक; ३ दुचाकी जप्त अटक करण्यात आलेला आरोपी: संदीप गोवर्धन गोरडे (वय ३३ वर्षे, रा. अंजनवती, ता. धामणगाव रेल्वे). कारवाईचा तपशील: ५ ऑक्टोबर […]

Read More

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर मौदा पोलिसांची धडक कारवाई; ११ गोवंशांची सुटका

मौदा (नागपूर): अवैध रीतीने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मौदा पोलिसांनी धडक कारवाई करत ११ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक व मालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर बातमी: गुप्त बातमीदाराकडून बातमी: दिनांक ०८/१०/२०२६ रोजी मौदा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून […]

Read More

ऑपरेशन प्रहार: अकोल्यात देशी कट्ट्यासह आरोपी अटक, ₹१.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेश प्रहार अंतर्गत अकोल्यात मोठी कारवाई: विनापरवाना देशी कट्टा व जिवंत कारतुसांसह आरोपी जेरबंद; १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त अकोला: अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या इसमांवर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वाहनतळासमोरील लोखंडी गेटजवळ सापळा रचून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. […]

Read More

वर्धेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: १.७१ लाखांच्या गांजासह तस्कर गजाआड!

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १.७१ लाखांच्या मुद्द्यामालासह गांजाची तस्करी करणारा आरोपी रंगेहात आवळला! वर्धा: जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्यानंतर, वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध अंमली पदार्थ विरोधी धडक मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी […]

Read More

एमपीडीए मध्ये पसार असलेला आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे यास घेतले गुन्हेप्रकटीकरण पथकाने ताब्यात

हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे याला अमरावती येथून हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी पथक) ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त आरोपीची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास: नाव: आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे (वय ३० वर्षे) राहणार: संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा. दाखल गुन्हे: संशयिताविरुद्ध मेफेड्रॉन (एमडी […]

Read More

पुलगाव येथे वर्धा जिल्हा पोलिसांची मासिक गुन्हे आढावा बैठक पारडली

वर्धा जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक मंगळवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी पुलगाव (जि. वर्धा) येथे पार पडली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवर पीपीटी (PPT) द्वारे […]

Read More

रिक्षा प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी जळगावची टोळी जेरबंद; १५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पुणे (समर्थ पोलीस ठाणे): रिक्षाने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सावज बनवून हातचालाखीने त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून टोळीतील ३ आरोपींना अटक केली आहे. घटनेची पार्श्वभूमी आणि गुन्हा :- दिनांक १४ […]

Read More

अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; सराईत चोराला अटक, इलेक्ट्रीक वायर चोरीचे ११ गुन्हे उघडकीस

अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे राजापेठ आणि गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेले इलेक्ट्रीक वायर चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसा कडून सुमारे ६५,००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पार्श्वभूमी व फिर्याद :- पल्स मेडिकल कार्डीयाक सेंटर (दरोगा प्लॉट, अमरावती) चे […]

Read More

बुलढाणा रुग्णालयातून पळालेला फरारी आरोपी ६ तासांत जाळ्यात; भुसावळातून भावासह अटक

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून रात्रीच्या वेळी शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या ६ तासांच्या आत जळगाव जिल्ह्यातील भुसावळजवळ शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपशील व घटनाक्रम गुन्हा आणि पार्श्वभूमी: एम.आय.डी.सी. मलकापूर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक […]

Read More

‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई; मोर्शी, चांदूर बाजार व चांदूर रेल्वेतून लाखो रुपयांची अवैध दारू जप्त!

अमरावती :- ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन कवच’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या अभियानांतर्गत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ०४ सप्टेंबर २०२६ व ०६ सप्टेंबर २०२६ रोजी मोर्शी, चांदूर बाजार आणि चांदूर रेल्वे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!