गोवंश तस्करी उधळली; भंडारा पोलिसांनी 32.50 लाखांचा मुद्देमाल पकडला

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

भंडाऱ्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 25 जनावरांची सुटका, 32.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा शहर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत 25 गोवंशीय जनावरांची सुटका केली असून दोन आयशर ट्रकसह एकूण 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रायपूर ते नागपूर मार्गावरून दोन आयशर ट्रकमधून गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भंडारा शहर बायपासवरील कोरंबी पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली. तपासादरम्यान एमएच-40 सीएम-2024 आणि एमएच-40 सीटी-2503 या दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.



अटक करण्यात आलेले आरोपी

या प्रकरणी पोलिसांनी खालील ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे:

  1. अनिल रामदास पातोंड (वय ४२ वर्षे, रा. महेंद्रनगर, टेका नाका, नागपूर)



  2. जाहीद हीदायद खान (वय ४८ वर्षे, क्लीनर, रा. चंगेरा, जि. गोंदिया)

  3. तिलकचंद भागवत बोरकर (वय ४१ वर्षे, रा. अरविंद नगर, उप्पलवाडी, नागपूर)



  4. शाहरूख अकबर अली सय्यद (वय ३६ वर्षे, क्लीनर, रा. छोटा रजेगाव, ता.जि. गोंदिया)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

पोलिसांनी ट्रकमधून जनावरांची सुटका करत ट्रक्ससह एकूण ३२.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



 गोवंश जनावरे: दोन्ही ट्रकमध्ये अत्यंत निर्दयतेने, तोंडाला मोरके आणि दोरीने पाय बांधून कोंबलेले एकूण २५ गोवंश जनावरे (एक ट्रक क्र. MH 40 CM 2024 मध्ये १२ जनावरे आणि दुसरा ट्रक क्र. MH 40 CT 2503 मध्ये १३ जनावरे) आढळले. (एकूण किंमत: रु. २,५०,०००/-).

आयशर ट्रक (MH 40 CM 2024): किंमत रु. १५,००,०००/-

आयशर ट्रक (MH 40 CT 2503): किंमत रु. १५,००,०००/-

एकूण जप्त मुद्देमाल: रु. ३२,५०,०००/-

दाखल करण्यात आलेले गुन्हे

आरोपींवर विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५ (अ), (ब)

  • प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ (डी), (एफ)

  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९

  • मोटार वाहन अधिनियम कलम ८३/१७७







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!