१ डिसेंबरपासून ‘चलान अभय योजना’; ई-चलनावर २० टक्के सवलत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


१ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ लागू; प्रलंबित ई-चलनावर २० टक्के सवलत

 महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना – २०२६’ राज्यात १ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रलंबित असलेले ई-चलन निकाली काढण्यासाठी वाहनधारकांना पात्र दंडाच्या रकमेवर २० टक्के सवलत देणारी ही योजना तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे. वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेसह राज्यातील पोलीस यंत्रणांनी नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

योजनेचे तीन टप्पे आणि कालावधी

  • १. एकवेळ सवलत योजना (One Time Concession)



    • पात्र कालावधी: २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या दरम्यान बजावलेली आणि योजना सुरू होताना वसुलीसाठी प्रलंबित असलेली तडजोडपात्र चलने.



    • सवलत व भरणा मुदत: दंडाच्या थकीत तडजोड रकमेवर २० टक्के सवलत; योजना सुरू झाल्यापासून (१ डिसेंबर २०२६ ते ३० डिसेंबर २०२६ दरम्यान / ३० दिवसांच्या आत) रक्कम भरणे आवश्यक.



  • २. लवकर भरणा योजना (Early Bird Scheme)

    • पात्र कालावधी: १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीत बजावण्यात येणारी पात्र चलने.



    • सवलत व भरणा मुदत: चालान विधीपूर्वक बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरल्यास २० टक्के सवलत.

  • ३. न्यायालयात प्रलंबित ई-चलनासाठी सवलत



    • पात्र कालावधी: ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान जारी झालेली आणि न्यायालयात (आभासी न्यायालयासह) दाखल असलेली तडजोडपात्र चलने.

    • सवलत व भरणा मुदत: २० टक्के सवलत; योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत भरणा करणे आवश्यक असून, आरोपीच्या स्वेच्छेच्या संमतीने व न्यायालयाच्या आदेशानुसार खटल्याचा निपटारा केला जाईल.

महत्त्वाच्या अटी व इशारा

  • परिवहन विभागाने किंवा त्याच्या अंमलबजावणी यंत्रणेने जारी केलेली चलने या योजनेच्या कक्षेत येत नाहीत.

  • रद्द झालेली, निकाली निघालेली किंवा योजना सुरू होण्यापूर्वी भरलेल्या दंडाची रक्कम परत मिळणार नाही.

  • एका चलनात तडजोडपात्र आणि तडजोड न करता येणारा असे दोन्ही गुन्हे असल्यास संपूर्ण चलन सवलतीसाठी अपात्र ठरते.

  • कारवाईचा इशारा: ई-चलन थकीत राहिल्यास किंवा योजनेची मुदत संपल्यानंतर वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन सेवा स्थगित होणे, परवाना निलंबित होणे, वाहन व्यवहारांवर निर्बंध येणे तसेच वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते.

दंड कुठे भरावा आणि सायबर फसवणुकीपासून सावधगिरी

  • अधिकृत ठिकाणे: वर्धा जिल्ह्यात दंडाची रक्कम केवळ जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखेचे अंमलदार किंवा संबंधित पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस अंमलदारांकडे भरावी. तसेच वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर (mahatrafficechallan.gov.in) किंवा जवळच्या वाहतूक पोलीस विभागात भरणा करता येतो.

  • सायबर सुरक्षितता: व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंक उघडून दंड भरू नये, अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाइन व्यवहार करू नये आणि अनोळखी वेबसाइटवर वाहन क्रमांक, बँक तपशील, कार्ड माहिती किंवा ओटीपी शेअर करू नये.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!