
रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन देसाईगंज पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा केला उघड….
वाहनासह चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस देसाईगंज पोलिसांनी केले जेरबंद, एकुण १,२५,०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त…..
देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,देसाईगंज पोलिस स्टेशन येथे नोंद असलेला अपराध क्रमांक २१/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता व अपराध क्रमांक १२८/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये वाहन चोरीच्या गुन्ह्यांत सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेतला असता मिळून आला नव्हता


याबाबत दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि, संदीप आगरकर यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की,एक इसम तरुण उर्फ तुषार राजू बजेवार, वय २२ वर्ष हा हनुमान वार्ड देसाईगंज जि. गडचिरोली याने आपल्या राहत्या घरी दोन चोरीच्या दुचाकी लपवून ठेवलेल्या आहेत व त्या दुचाकी तो कोणाला तरी विकण्याच्या तयारीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रात्री १०.३० वा. सपोनि. संदीप आगरकर हे पोलिस पथकासह सदर ठिकाणी रवाना झाले.सदर ठिकाणी पोहचताच आरोपीस नमुद गुन्हयात ताब्यात घेऊन विचारपूस केले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीकडे वाहनाच्या कागदपत्राबाबत सखोल चौकशी केली असता त्याबाबत त्याने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

त्यानंतर पोस्टे येथील अभिलेख तपासले असता, वाहन क्र. १) एम.एच.३५ए.एल.६१७० काळया रंगाची हीरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल ही पोस्टे दाखल अप. क्र. २१/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. गुन्हयातील चोरीस गेलेला वाहन असून किंमत अंदाजे ८०,०००/- रुपये असल्याचे दिसून आले. तसेच वाहन क्र. २) एम.एच.३३ यु ३९३० होंडा शाईन ही पोस्टे. दाखल अप. क्र. १२८/२०२४ कलम ३७९ भादवि किंमत अंदाजे ४५,०००/- रुपये मधील असल्याचे आढळून आले. त्यानंतर नमुद गुन्हयामध्ये आरोपी तरुण उर्फ तुषार राजू बुजेचार वय २२ वर्ष याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीच्या ताब्यातील दोन्ही दुचाकी वाहन अंदाजे किंमत १,२५०००/- रू चा मुद्देमाल जप्त करुन नमुद गुन्ह्यात त्याला अटक करुन माननीय प्रथम श्रेणी न्यायालय देसाईगंज यांच्या समक्ष हजर करण्यात आले. मा. न्यायालयाने त्याला ०२ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधीक तपासात असे दिसून आले की, सदर अटक आरोपी हा पोलीस ठाणे ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील एका खुनाच्या गुन्हयातील रेकॉर्ड वरील आरोपी आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधिक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधिक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील पोलिस निरीक्षक अजय जगताप, यांच्या नेतृत्वात सपोनि. संदीप आगरकर, सपोनि. मनीष गोडबोले, पोशि विलास बालमवार,नितेश कढव,सतीश बैलमारे,रोशन गरमडे यांनी पार पाडली.
***


