रामनगर परीसरात घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

रामनगर हद्दीत घरफोडी करणारा चोरटा अखेर स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पोलिसांचे जाळ्यात,नगदी 1 लाख रक्कम रुपये हस्तगत…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी अंकीता रमेशजी मस्के रा. पुराणा पॉवर हाऊस जवळ, रामनगर गोंदिया ह्या घरी कोणीही नसल्याने दिनांक- 01. 04. 2024 चे रात्री 11.30 वाजता तिचे राहते घराचे मुख्य दाराला कुलुप लावुन तिचे काकु पुष्पा प्रभाकर गुरव यांचेकडे रात्रीला मुक्कामास होत्या सकाळी 06.00 वा. घरी परत आल्यावर बघितले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घराचे मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून बेडरूम मधील आलमारीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने किंमत 3 लाख 62 हजार 500/- रू. व नगदी 2 लाख 40 हजार /- रू असा एकुण 6 लाख 2 हजार 500/- रुपयांचा मुददेमाल अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे रामनगर येथे अपराध क्र. 97/2024 कलम 457, 380 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता





सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने प्राप्त वरिष्ठांचे सुचनेनुसार स्था.गु.शा. पोलिस पथक पो. नि. दिनेश लबडे, स्था.गु.शा. गोंदिया यांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळाला भेट देवून परिसराची बारकाईने निरीक्षण, आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे ची पाहणी केली असता प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, वरून संशयित गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून गोपनीय बातमीदार कडून प्राप्त माहितीच्या आधारे *घरफोडी करणारा गुन्हेगार आरोपी इरफान अब्दुल अलीम सय्यद रा. हनुमान मंदीर जवळ, कटंगीटोला, गोंदिया ता.जिल्हा- गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी तपास केला असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने दिनांक 1 रोजी रामनगर येथे घरफोडी केल्याचे कबुल केल्याने आरोपीचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल पैकी नगदी- 1 लाख रुपये रक्कम (500/- रु दराच्या 180 चलनी नोटा, 100/रु दराच्या 100 चलनी नोटा ) असा नगदी रक्कम मुद्देमाल  हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिण्या संबंधात विचारणा केली असता त्याने दागिने त्याचे बहिणीकडे दिल्याचे सांगितले,गुन्ह्यासंबंधात अधिकचा तपास सुरू आहे .आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई, तपास कामाने पो. स्टे. रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.गुन्ह्याचा अधिकचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथक सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्ने, म. पोउपनि वनिता सायकर, पोहवा.सोमु तुरकर,रियाज शेख, इंद्रजित बिसेन, तुलसी लुटे, पोशि-संतोष केदार, अजय रहांगडाले,मपोशि स्मिता तोंडरे, चापोशि कुंभलवार यांनी केली आहे…







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!