राजुरा शहरात घरासमोरून १ लाखाची मोपेट चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांत घेतले ताब्यात, मोपेट जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


राजुरा (चंद्रपूर):

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत घरसामोर उभी असलेली तब्बल १ लाख रुपये किमतीची मोपेट मोटार सायकल लांबवणाऱ्या चोरट्यास राजुरा पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. गुप्त बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत आरोपीकडून चोरीला गेलेली संपूर्ण मोपेट गाडी हस्तगत केली आहे.



काय आहे नेमकी घटना?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद मदत झाडे (रा. जवाहरनगर, राजुरा) यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती की, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता ते दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची हिरो कंपनीची ‘मास्ट्रो’ (Maestro) मोपेट (क्र. MH 34 BA 3464, किंमत अंदाजे १,००,००० रुपये) चोरून नेली. या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने हलवली.



पोलिसांची तत्पर कारवाई आणि आरोपी गजाआड

गुन्ह्याचे गांभीर्य व वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासासाठी विशेष पथक नेमले. पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक  कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. (गुन्हे शोध) पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा रचला.



तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जवाहरनगर, राजुरा येथील संशयित आरोपी दीपक मारोती उमरे (वय ३८ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. माता मंदिर वार्ड, राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची हिरो मास्ट्रो मोपेट (किंमत १,००,००० रुपये) पूर्णपणे जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्याला अटक केली आहे.

यशस्वी कारवाई करणारे पथक

सदर महत्त्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सपोनि लक्ष्मण लोकरे, सहायक फौजदार (सफौ) किशोर तुमराम, संजय चौधरी, पोलीस हवालदार (पोहवा) विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलींद जांभुळे, रमेश बस्सी, गुडेराव पोले आणि राजीव दुबे यांच्या पथकाने पार पाडली. राजुरा पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!