
दर्यापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती ग्रामीण:
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्हəयात अवैध जुगार धंद्यांवर आळा घालण्यासाठी आणि जुगार खेळणाऱ्या इसमांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या कडक सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना दिल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील दर्यापूर उपविभागातील पथक दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असताना, एका जुगाराविषयी गोपनिय बातमी मिळाली. दर्यापूर येथील राजपूतपुरा भागातील रहिवासी गजेंद्र गोपालसिंग बैस हा त्याच्या राहत्या घरी काही लोकांसोबत ५२ तासपत्त्यांवर पैशाची बाजी लावून ‘एक्का बादशहा’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर घराची पंचांसमक्ष पंचानामा करून धाड टाकली असता, तेथे १३ इसम जुगार खेळताना रंगेहात सापडले.

१) अटक/कारवाई करण्यात आलेल्या १३ आरोपींची नावे:
१. तसवर खान तसलीम खान (वय ४० वर्षे, रा. जुनी वस्ती, मूर्तिजापूर, जि. अकोला)
२. अर्जुन दत्तात्रय गावंडे (वय ३५ वर्षे, रा. ड्रीम लँड सिटी, दर्यापूर)

३. अमित राजेश लोकपूरे (वय ३२ वर्षे, रा. भवानी नगर, मूर्तिजापूर, जि. अकोला)
४. योगेश पुंडलीकराव कात्रे (वय ३६ वर्षे, रा. सामदा, ता. दर्यापूर)

५. अमोल अशोकसिंग ठाकूर (वय ३६ वर्षे, रा. नारायण नगर, दर्यापूर)
६. जुबेर खान इस्माईल खान (वय ३७ वर्षे, रा. मोमिनपुरा, मूर्तिजापूर, जि. अकोला)
७. रितेश मधुकरराव नवलेकर (वय ३५ वर्षे, रा. सामदा, ता. दर्यापूर)
८. सागर गजानन काळे (वय ३४ वर्षे, रा. बाभळी, ता. दर्यापूर)
९. योगेश उर्फ विक्की बाबनराव बिल्हेकर (वय ३५ वर्षे, रा. बाभळी, ता. दर्यापूर)
१०. नागेश नारायण सुलताने (वय ३० वर्षे, रा. शिरसोली, ता. कारंजा, जि. वाशिम)
११. मुज्जू खान सलीम खान (वय ३८ वर्षे, रा. जुनी वस्ती, मूर्तिजापूर, जि. अकोला)
१२. सुशील उत्तमराव घुरमाडे (वय ३५ वर्षे, रा. गांधी नगर, दर्यापूर)
१३. गजेंद्र गोपालसिंग बैस (वय ५७ वर्षे, रा. राजपूतपुरा, दर्यापूर – घर मालक/मुख्य )
२) जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹ ९,३३,४५०/-):
-
रोख रक्कम: १,०८,४५०/- रुपये
-
मोबाईल फोन: १३ नग (किंमत अंदाजे ८५,०००/- रुपये)
-
मोटारसायकल: ३ गाड्या (किंमत अंदाजे २,४०,०००/- रुपये)
-
चारचाकी वाहन: १ स्विफ्ट कार (किंमत अंदाजे ५,००,०००/- रुपये)
-
इतर साहित्य: ५२ तास पत्ते
सर्व आरोपींविरोधात दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये जुगार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पो.उपनि. सतिश झाल्टे, पोलीस अंमलदार मंगेश लकडे, सचिन मसांगे, हर्षल काळे आणि चालक हर्षद घुसे यांच्या पथकाने पार पाडली.




