नागपूरमधून १.५३ कोटींची ‘शिवाई’ बस चोरणारा आंतरराज्यीय चोरटा अमरावतीत जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राजापेठ  पोलिसांनी इमामवाडा बस स्थानक, नागपूर येथून १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ‘शिवाई’ बस (क्रमांक MH 49 BJ 8258) चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय चोरट्याला अटक केली आहे.ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

  • आरोपीची माहिती: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विष्णु गणपती नीलावर (वय २३ वर्ष), राहणार- हईत नगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगाणा असे आहे.



  • घटना आणि अटक: १ जुलै २०२६ रोजी रात्री १:०० वाजताच्या सुमारास आरोपीने नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकावरून चार्जिंगला लावलेली शिवाई बस चोरली होती. ही बस अमरावतीतील नंदा मार्केट, राजापेठ येथे उभी असल्याची आणि चोरटा गद्रे चौक येथे असल्याची माहिती राजापेठ पोलिसांच्या बीट मार्शलला मिळाली. त्यानंतर डी.बी. पथकाने तात्काळ कारवाई करत बस आणि चोरट्याला ताब्यात घेतले.

  • मोडस ऑपेरंडी (गुन्ह्याची पद्धत): आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि डिस्क काढून विकायचा आणि बसचे उर्वरित भाग त्याच ठिकाणी सोडून द्यायचा.



  • पूर्वीचे गुन्हे: आरोपी हा सराईत चोर असून त्याने यापूर्वी तेलंगाणा, हैद्राबाद आणि आंध्र प्रदेशातून सुमारे २० बसेस चोरल्या आहेत. याशिवाय त्याने नांदेड बस डेपोमधूनही एक बस चोरली होती, ज्याची नोंद वजीराबाद पोलीस स्टेशन (नांदेड) आणि तिरुमाला क्राईम पोलीस स्टेशन (आंध्र प्रदेश) येथे आहे.

  • ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, उमेश मुंडे, नितीन शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!