कल्याण पोलिसांनी केले ७ लक्ष किंमतीचे MD DRUG जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कल्याण – सवीस्तर व्रुत्त असे की  कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स  तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना
पोलिसांनी अटक केली आहे. तर  कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किंमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले. कल्याण- डोंबिवली परिसरात अनेक गुन्ह्यामधील आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर
सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली
कल्याण कोळशेवाडी  पोलिस व खडकपाडा पोलिसांनी ड्रग्स तस्करांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान एका रिक्षामध्ये दोघजण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांना बघून या रिक्षा चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करत ऑटो रिक्षा ताब्यात घेत सुनील यादव व युवराज गुप्ता या दोन जणांची झडती घेतली. या दोघांजवळ एम डी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक चुकवूइमेका इमेका हा एमडी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा रचुन या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड ठोकल्या. या तिघांकडून एकूण पावणे सहा लाख किमतीचे सुमारे २८५ ग्रॅम ड्रग्स जप्त केले. यानंतर
खडकपाडा पोलिसांचे पथक कल्याणजवळील आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत असताना एक इराणी महिला संशयस्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे ३४ ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले. फिजा इराणी असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी फिजा इराणी हिला बेड्या ठोकल्यात.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!