
अकोल्यात हातभट्टीवर एलसीबीची धाड; २ आरोपींसह ४.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला:-
अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात धाड टाकून तब्बल ४,९८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे धाड पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायगाव येथे अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी गावठी दारू गाळत असताना रंगेहात आढळून आले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १. हुसैन बुद्धू नौरंगाबादी (रा. फरीदनगर, फरीदिया मशिदीजवळ, नायगाव अकोटफाईल, अकोला) २. संतोष शिवराम घणे (वय ५० वर्षे, रा. मंगरूळपीर, जि. वाशीम; सध्या रा. बस स्टँडजवळ, अकोला)

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹४,९८,६००/-):
-
सडवा मोहामाच: ३२०० लीटर (अंदाजे किंमत ₹४,८०,०००/-)

-
गावठी हातभट्टी दारू: ७५ लीटर (अंदाजे किंमत ₹१५,०००/-)
-
इतर साहित्य: अंदाजे किंमत ₹३,६००/-

आरोपींसह जप्त केलेला सर्व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही धडक कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सपोनि गोपाल जाधव, पो.उप.नि. विष्णू बोडखे, पो.उप.नि. अनिल चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, फिरोज खान, अब्दुल माजीद, एजाज अहमद, सुलतान पठाण, अमित दुबे, खुशाल नेमाडे, धीरज वानखडे, राज चंदेल, अभिषेक पाठक, मो. आमीर आणि चालक रामकिसन डोईफोडे व प्रकाश लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




