
एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी: वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक; २ दुचाकी जप्त

नागपूर:
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची हिरो स्पेंडर प्लस आणि आणखी एक दुचाकी असा एकूण ८५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


घटनेची पार्श्वभूमी:
दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७:०० ते रात्री ७:०० वाजat दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेमेघ नगर येथील देवनारायण पांडे यांच्या घरी भाड्याने राहणारे फिर्यादी गौरव गिरीश दुरूतकर (वय २६ वर्षे) यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो स्पेंडर प्लस दुचाकी (क्र. MH 40 BM 6671, किंमत अंदाजे ३५,०००/- रुपये) आपल्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोराने ही गाडी चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास आणि कारवाई:
गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलिसांना खबऱ्यामार्फत गोपनिय माहिती मिळाली की, महेंद्र सोनवणे नावाच्या इसमाकडे मध्य प्रदेश पासिंगची एक दुचाकी असून तो ती विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महेंद्र खेमराज सोनवणे (वय २६ वर्षे, रा. पाूळदौना, फुकामेटा, ता. आमगाव, जि. गोंदिया, ह.मु. वैशाली नगर, टॉवर लाईन, बिसेन यांचे घर, ता. हिंगणा, जि. नागपूर) यास एका दुचाकीसह ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने वाहन चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीची गाडी तसेच हिरो स्पेंडर (क्र. MP 50 MY 7597, किंमत ५०,०००/- रुपये) अशी एकूण २ मोटारसायकल (किंमत ८५,०००/- रुपये) जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस पथक:
सदरची यशस्वी कामगिरी सिंगारेड्डी ऋषीकेश रेड्डी (पोलिस उप आयुक्त, परि. क्र. १), यशवंत नलावडे (सहा. पोलीस आयुक्त, एमआयडीसी विभाग) यांच्या मार्गदर्शनखाली, वपोनि. बाबुराव राऊत, दुपोनि. पुरुषोत्तम देवकर, सपनि. गजानन काठेवाडे, पोउपनि. पंकज सयाम, पोहवा. प्रमोद गिरी, प्रमोद सोनवणे, प्रविण फलके, विक्रांत देशमुख, पोअं. किरण शेजवळ व किरण इंगळे यांनी केली.





